सार

चिखली, बुलढाण्यातील शिक्षकांचा 'नाच रे मोरा' गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना नृत्य शिकवताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एखादी व्यक्ती डान्स करत असतानाचे व्हिडीओ मोठया प्रमाणावर शॉर्ट आणि रील व्हिडिओला टाकले जात आहेत. चिखली जिल्हा बुलढाणा येथील शिक्षकांचा नाच रे मोरा गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील शिक्षक हे शाळेतील विद्यार्थ्यांना नृत्य कसे करायचे, हे शिकवत आहेत. 

नाच रे मोरा गाण्यावर शिक्षकांनी केले नृत्य - 
नाच रे मोरा गाण्यावरील व्हिडिओमधील शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत आणि त्यांच्या पुढं असणारे विद्यार्थी त्यांना फॉलो करत असल्याचे व्हिडिओमधून दिसून आले आहे. या गाण्यावर पुढे उभे असलेले विद्यार्थी आपल्या शिक्षकांना फॉलो करत असून नाचत असल्याचे दिसत आहे. आशिष या अकाऊंटवरून एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आले आहे. 

लोकांनी पोस्टवर करण्यात आल्यात कमेंट - 
लोकांनी या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्याचं दिसून आलं आहे. अनेकांनी यावर बोलताना आम्हाला असे शिक्षक नव्हते तर मारणारे शिक्षक होते असं म्हटलं आहे. यावर असे शिक्षक आम्हाला असायला हवे होते असेही म्हटले आहे.