सार

लोकसभा निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.

Navneet Rana Certificate Case : सुप्रीम कोर्टाने अमरावती (Amravati) येथील अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांना बनावट जात प्रमाणपत्रासंदर्भात गुरुवारी (4 एप्रिल) मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नवनीत राणांच्या अनुसूचित जातीच्या बनावट प्रमाणपत्रासंदर्भात मुंबई उच्च न्यायलयाने (Bombay High Court) दिलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे.

नवनीत राणा यांचे अनुसूचित जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते. अमरावती लोकसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून तेथूनच नवनीत राणा खासदार आहेत. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र तयार केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्रावर सुनावला होता निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष 2021 मध्ये नवनीत राणा यांच्या अनुसूचित जात प्रमाणपत्रावर निर्णय सुनावला होता. राणा यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय देत त्यांच्यावर दोन लाख रुपयांचा दंडही लावण्यात आला होता. यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय नवनीत राणा यांचा अमरावती येथून लोकसभेची निवडणूक लढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना अमरावती येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटले की, स्क्रूटनी कमिटीने सर्वांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच निर्णय घेतला आहे. कमिटीने पडताळणी करण्यासह सर्व कागदपत्रेही पाहिल्यानंतरच जात प्रमाणपत्र देण्यात आले होते. यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणात दखल घेण्याची गरज नव्हती. आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा असा अर्थ होतो की, वर्ष 2019 मध्ये नवनीत राणा यांनी लढवलेली लोकसभा निवडणूक वैध होती. यंदाच्या निवडणुकीतही नवनीत राणा यांना कोणता अडथळा येणार नाही. नवनीत राणा यांचा वर्ष 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय झाला होता.

नवनीत राणा यांची प्रतिक्रिया 
सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्राबद्दल दिलासा दिल्याने त्यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये "सत्यमेव जयते म्हणत असत्यपर सत्य की जीत हुई" असेही म्हटले आहे. 

आणखी वाचा : 

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर संजय निरुपम आज करणार मोठी घोषणा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार एण्ट्री?

Lok Sabha Election 2024 : 'आम्ही राज्यात 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार', उदय सामंत यांचा दावा

हिंगोली लोकसभेचे हेमंत पाटलांच शिवसेना कापणार तिकीट, संतोष बांगर राहणार आगामी उमेदवार?