काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर संजय निरुपम आज करणार मोठी घोषणा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार एण्ट्री?

| Published : Apr 04 2024, 10:53 AM IST / Updated: Apr 04 2024, 10:58 AM IST

Sanjay Nirupam

सार

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे संजय निरुपम कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खरंतर, पक्षाने निरुपम यांचे स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव हटवले होते.

Sanjay Nirupam Resigns : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खरंतर, पक्षाने निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. यानंतरच संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुरुवारी (4 एप्रिल) सकाळी 11.30 ते 12 वाजताच्या दरम्यान संजय निरुपम आपली पुढची भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
संजय निरुपम यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम जागा शिवसेनेला देणे आणि अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना तेथून तिकीट दिल्याने विरोध दर्शवला होता. याशिवाय अमोल कीर्तिकर यांच्यासाठी प्रचार करणार नाही असेही संजय निरुपम यांनी म्हटले होते. यानंतर पक्षाने संजय निरुपम यांना अल्टिमेटम दिला होता. अखेर संजय निरुपम यांनी राजीनामा दिला.

सूत्रांनुसार, गुरुवारी (4 एप्रिल) संजय निरुपम एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) एण्ट्री करणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले की, संजय निरुपम यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली नव्हती. त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली.

स्टार प्रचाराकांच्या यादीतून नाव हटवले
काँग्रेसने संजय निरुपम यांचे स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव हटवले होते. यावर निरुपम यांनी पक्षावर हल्लाबोल केला होता. पक्ष आर्थिक संकटांचा सामना करतोय, यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असेही संजय निरुपम यांनी म्हटले होते.

जागा वाटपावरून काय म्हणाले संजय निरुपम?
मुंबई उत्तर येथील माजी खासदार संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सहा लोकसभेच्या जागांपैकी चार आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याच्या निर्णयावर विधान केले होते. निरुपम यांनी म्हटले होते की, काँग्रेसने शिवसेनेसमोर झुकतेपणा घेऊ नये. याशिवाय शिवसेना पाच जागांवर निवडणूक लढवू पाहत आहे. एक जागा दान म्हणून काँग्रेसला देत आहेत. हा निर्णय मुंबईतील काँग्रेसला संपण्यासारखा आहे. या निर्णयाचाी निंदा करतो असेही निरुपम यांनी म्हटले होते.

आणखी वाचा : 

मला त्यांनी माफ करावं हा माझा काही विषय नाही मी त्यांना माफ करेन हे निश्चित आहे, सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांना दिल प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024 : 'आम्ही राज्यात 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार', उदय सामंत यांचा दावा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने उभ्या राहणार? राजू शेट्टींच्या विरोधात होणार लढत

Read more Articles on