- Home
- Maharashtra
- Sukanya Samriddhi Yojana 2025: मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करायची?, जाणून घ्या फायदे आणि व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana 2025: मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करायची?, जाणून घ्या फायदे आणि व्याजदर
Sukanya Samriddhi Yojana 2025: सुकन्या समृद्धी योजना 2025 ही केंद्र सरकारची 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अंतर्गत मुलींच्या उज्वल भविष्यासाठी असलेली एक लघु बचत योजना आहे.

मुलीच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करताय?
Sukanya Samriddhi Yojana 2025: आपल्या मुलीच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करताय? तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही तुमच्यासाठी एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय ठरू शकते. शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक तयारी करण्यासाठी ही योजना विशेष उपयुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय?
सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत सुरू केलेली एक लघु बचत योजना आहे. ही योजना 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाली आणि आज ती पालकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
सध्याचा व्याजदर (जुलै - सप्टेंबर 2025)
8.2% वार्षिक (चक्रवाढ पद्धतीने)
हा दर इतर पारंपरिक बचत योजनांपेक्षा अधिक असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
सुकन्या समृद्धी योजनेचे महत्त्वाचे फायदे
करसवलत (Tax Benefit)
कलम 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत टॅक्स सवलत
व्याज व अंतिम परतावा पूर्णतः करमुक्त
उच्च व्याजदर
बँक FD किंवा इतर बचत योजनांपेक्षा जास्त परतावा
शासकीय सुरक्षितता
केंद्र सरकारची योजना असल्यामुळे गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित
फक्त ₹250 पासून सुरुवात
एक आर्थिक वर्षात ₹1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते
मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर खात्यातील 50% रक्कम शिक्षणासाठी काढता येते
खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रं
जन्म प्रमाणपत्र – मुलीचं वय सिद्ध करण्यासाठी
पालकाचा ओळखपत्र – आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट इ.
पत्ता पुरावा – वीज बिल / टेलिफोन बिल / निवास प्रमाणपत्र इ.
पासपोर्ट साईझ फोटो – पालक व मुलीचा
योजनेत सहभागी होण्यासाठी अटी
मुलीचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक
खाते पालक किंवा कायदेशीर पालक उघडू शकतो
एका कुटुंबात केवळ दोन मुलींसाठी खाती उघडता येतात (द्विन्स / ट्रिप्लेट्ससाठी अपवाद)
बँक किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते
तुमच्या मुलीचं भविष्य आजच सुरक्षित करा!
सुकन्या समृद्धी योजना ही फक्त गुंतवणूक नव्हे, तर मुलीच्या भविष्यातील स्वप्नांची पायाभरणी आहे. अल्प गुंतवणुकीतून दीर्घकालीन फायदे घेण्यासाठी ही योजना आजच सुरू करा.

