- Home
- Maharashtra
- Police Bharti 2025: राज्यात 15,000+ पोलीस भरती!, तुमच्या जिल्ह्यात किती जागा?; जाणून घ्या सविस्तर माहिती
Police Bharti 2025: राज्यात 15,000+ पोलीस भरती!, तुमच्या जिल्ह्यात किती जागा?; जाणून घ्या सविस्तर माहिती
Police Bharti 2025: राज्यात पोलीस शिपाई आणि कारागृह विभागात एकूण 15,631 पदांवर मोठी भरती जाहीर झाली आहे. 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची शेवटची संधी मिळणार आहे.

तरुणांसाठी दिलासादायक बातमी
Police Bharti 2025: राज्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पोलीस शिपाई आणि कारागृह विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असून, एकूण 15,631 पदांवर भरती होणार आहे. जे उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची वाट पाहत होते, त्यांच्या स्वप्नांना आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.
ही आहे तुमच्यासाठी शेवटची संधी!
2022 ते 2025 दरम्यान सरकारी नोकरीसाठी पात्र वयोमर्यादा पार केलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांचं वय आता मर्यादेतून बाहेर जात आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. अनेक उमेदवारांनी आता कंबर कसून तयारी सुरू केली आहे.
जिल्हानिहाय जागांची माहिती
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरतीसाठी पदांचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
जिल्हा / विभाग पदसंख्या
मुंबई शहर 2459
ठाणे शहर 867
मीरा-भाईंदर 924
पुणे शहर 885
पिंपरी चिंचवड 356
नवी मुंबई 88
नाशिक ग्रामीण 172
नागपूर शहर 398
छत्रपती संभाजीनगर 150
जळगाव 171
धुळे 137
मुंबई रेल्वे पोलीस 743
पदांनुसार भरतीचं वर्गीकरण
पोलीस शिपाई: 10,908 पदे
पोलीस वाहनचालक: 234 पदे
SRPF पोलीस शिपाई: 1062 पदे
अनुकंपा तत्वावरील भरती: 19 पदे
आंतरजिल्हा भरती: 1350 पदे
एकूण पदसंख्या: 15,631
निवड प्रक्रिया कशी असेल?
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुढील टप्प्यांत होईल.
शारीरिक चाचणी (50 गुण)
लेखी परीक्षा (100 गुण)
कागदपत्र पडताळणी
अंतिम गुणवत्ता यादी
उमेदवाराला एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे. लेखी परीक्षा सर्व पदांसाठी एकाच दिवशी होईल.
भरतीची तारीख अद्याप जाहीर नाही!
भरती प्रक्रियेची अचूक तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नसली, तरी उमेदवारांनी तयारीला गती देणं आवश्यक आहे. आगामी निवडणुका व सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस विभागाने भरतीचे नियोजन सुरू केले आहे.
तयारीला सुरुवात करा, संधी गमावू नका!
‘खाकी वर्दी’ घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. शारीरिक आणि लेखी चाचणी यासाठी नियोजित अभ्यास आणि नियमित सराव करून तुमचे स्वप्न साकार करा.

