एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेने ऐन दिवाळीत संपाचा इशारा दिला आहे.  ST employees to go on strike 

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचारी ऐन दिवाळीच्या मुहुर्तावर परत एकदा संप करण्याच्या तयारीत आहेत. याआधी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर संपाला सुरुवात केली होती. त्यामुळं अनेक ठिकाणी लोकांचा संपर्क तुटला होता आणि काम खोळंबून पडली होती. आता परत एकदा संपाचे हत्यार उपासल्यावर नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

खासगी भाडेचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुली 

एसटी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे. शहरातून ग्रामीण भागाकडे सुट्टीला जाणाऱ्या लोकांची यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळं एसटी संप पुकारण्यापूर्वी सर्वसामान्यांचा विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच म्हणणं काय आहे? 

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे . एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेने केला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेकडून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात हे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या मागण्या केल्या आहेत? 

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत. पण शासनाकडून हवा तसा प्रतिसाद मात्र मिळालेला नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वातील सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.