सार

महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे. या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे.

महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे. या मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत होणार आहे. येथून मागील लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे निवडून आले होते. यावेळी शिवानी वडेट्टीवार यांनी येथून तिकीट मागितले होते पण पक्षाने प्रतिभा धानोरकर यांनाच परत तिकीट जाहीर केलं. 

प्रतिभा धानोरकर काय म्हटल्या - 
आता प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. प्रतिभा धानोरकर यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, "“सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या अश्रूंवर टीका केली. मी एक विधवा महिला त्यांना कधीच माफ करणार नाही”, असं प्रतिभा धानोरकर आपल्या भाषणात म्हणाल्या. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनीदेखीस आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला त्यांनी माफ करावं हा विषय नाही. पण मी त्यांना माफ करेन”
 

सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेलं प्रत्युत्तर - 
सुधीर मुनगंटीवार यांनी यावर बोलताना म्हटलं आहे की, "मला त्यांनी माफ करावं, मी त्यांना माफ करेल हे निश्चित आहे. निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे. मला देशाचं राजकारण करायचं आहे. मला देशात राजकारण करायचं आहे, असं प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. येथील निवडणूक ही रंजक होणार असून जनता आता येथील कोणता उमेदवार निवडून येईल हे ठरवेल हे लक्षात येईल. 
आणखी वाचा - 
उद्धव ठाकरे गटाने लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी केली जाहीर, महाविकास आघाडी काय घेणार निर्णय?
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा कॅन्सरशी लढा, लोकसभा निवडणूक प्रचारात होणार नाहीत सहभागी