सार
राज्याच्या राजकारणात फार मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या पत्ता कट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
राज्याच्या राजकारणात फार मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या पत्ता कट होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. धैर्यशील माने यांच्याऐवजी आता येथून त्यांच्या आई निवेदिता माने यांना तिकीट जाहीर केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवेदिता माने हातकणंगले लोकसभेतून उभ्या राहणार? -
धैर्यशील माने यांच्या आई निवेदिता माने या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दोनवेळा खासदार झाले आहेत. त्या 1999 आणि 2004 मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने हे राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडून आले होते. यावेळी राजू शेट्टी यांच्या विरोधात निवेदिता माने या उमेदवार असणार आहेत.
उमेदवार का बदलावा लागणार? -
हातकंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेलं धैर्यशील माने यांच्याबद्दल येथील मतदारांमध्ये नाराजी आहे. मात्र सुरुवातीपासून या मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात यावा अशी भाजपकडून मागणी केली जात होती. त्यामुळे धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलण्यात येईल असे सांगितले होते. त्यामुळे हातकणंगले येथील उमेदवारी बदलण्यासाठी मोठा दबाव निर्माण केला जात आहे.