शिळ्या जेवणावरून आमदार संजय गायकवाड आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. यामध्ये गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. कर्मचारी संघटनेने गायकवाडांवर कारवाईची मागणी केली आहे.

राजकारणातील वाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून आलं आहे. आता आमदार संजय गायकवाड हे वादात सापडले आहेत. शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरून त्यांनी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

शिळ्या जेवणावरून झाला वाद 

शिळ्या जेवणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, कॅन्टीनमध्ये जेवणासाठी दिलेली डाळ ही शिळी आणि वास मारत होती. यावेळी व्यवस्थापन आणि गायकवाड या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला की गायकवाड यांनी व्यवस्थापकाला मारहाण केली आहे.

Scroll to load tweet…

आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी 

आमदार गायकवाड यांनी कर्मचाऱ्यावर हात उचलल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे. आमदार निवास सारख्या ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे अस्वस्थता पसरली आहे.

राहुल गांधींची जीभ कपणाऱ्यास देणार बक्षीस 

सप्टेंबर २०२४ मध्ये, संजय गायकवाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानावर संताप व्यक्त करत, "कोणी राहुल गांधींची जिभ कापली तर त्याला ११ लाख रुपये देईन" अशी घोषणा केली. या विधानामुळे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली होती आणि भारतीय काँग्रेसने त्या विधानावरून बॉम्बे उच्च न्यायालयात स्वतःहून कारवाई करण्याची मागणी केली

काँग्रेस कुत्र्यांना दफन करण्याचं केलं वादग्रस्त वक्तव्य 

१८ सप्टेंबर २०२४ – गायकवाड यांनी आणखी एक भडक विधान केलं: "जर कोणताही काँग्रेसचा ‘कुत्रा’ (dog) त्यांच्या कार्यक्रमात आला तर त्याला मी तिथेच दफन करून टाकेन" अशी धमकी देऊन राजकीय वादाला तोंड फुटले होते. या विधानावरून विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.