सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर ४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

1. जिथे पिकतं तिथे विकत नसतं, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. यावेळी एवढी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेतात तर मी सोडून आमदार मिळावा, म्हणजे माझ्या कामाचं महत्व कळेल असेही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.

2. शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 वर्ष कळणार नाही, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला काय करायचंय असा टोलाही अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

3. माझ्या सरकारने 600 निर्णय घेतले, पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केली.

4. बीडमध्ये मोठा उलटफेर, कृषीमंत्री धनंजय मुंडे भल्या पहाटे मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्याचा मनोज जरांगे यांनी दावा केला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र भेटीचा इन्कार केला आहे.

5. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 90 दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे, सोयाबीनला 4 हजार 892 रुपयांचा हमी भाव मिळणार आहे.