सोमवार, ९ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

| Published : Sep 09 2024, 07:53 AM IST / Updated: Sep 09 2024, 08:10 PM IST

thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर ४ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

1. जागावाटपादरम्यान सर्व घटकपक्षांचा मान राखला जाईल, अमित शाहांकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हमी देण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर बैठक संपन्न झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमित शाह सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीसांच्या घरीही त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

2. शरद पवार यांनी जावई आणि नातीसह लालबागचा राजा आणि चिंतामणीचं दर्शन घेतले आहे. पवारांचं गणेशदर्शन म्हणजे ढोंगीपणा अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

3. राज्य सरकारच्या तिन्ही वीज कंपन्यांमधल्या कंत्राटी कामगारांना 19 टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय घेतला आहे.

4. समृद्धी महामार्ग संभाजीनगर मार्गे पुण्याला जोडणार आहेत. या प्रकल्पाला जवळपास साडेनऊ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे

5. फडणवीस साहेब तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही, बीडमधील घोंगडी बैठकीत मनोज जरांगे यांनी पुन्हा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केली आहे.