राज ठाकरे यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे. आयुष्यभर केसांना तेल लावूनही एका माणसाला बुद्धी आली नाही, असा टोला त्यांनी लगावला आणि पाटील यांनी जेन झी पिढीचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
राज ठाकरे कायमच काही न काही कारणानं चर्चेत येत असतात. त्यांनी आता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सध्याच्या काळात आपण जेन झी पिढीला अपेक्षित असल्याप्रमाणे विचार करायला हवा. लहानपणी आई आपल्याला डोक्याला तेल लावत जा. बुद्धी तल्लख होईल असं अनेकदा सांगायची.
एका माणसाला बुद्धी आलीच नाही
एका माणसाने आयुष्यभर केसाला चोपडल. पण त्याला बुद्धी आलीच नाही. या माणसाचा प्रत्येक केस हा स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. अशा कडक शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. चंद्रकांत पाटील हे आपले उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत. त्यांनी आपण काय बोलतोय जग कुठं चाललंय याचा विचार करायला हवा, असं राज यांनी म्हटलं आहे.
मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फूटप्रिंट बघायचेत
मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फूटप्रिंट बघायचेत. कोल्हापूरच्या माणसांनी या माणसाला ज्ञान मिळावं म्हणून पुण्याला पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. पण इथं आल्यानंतर त्याच काही झालं नाही. आता नवीन पिढी अशी माणसं आमच्या आयुष्यात का आणली असतील अशी तक्रार करतात. ते म्हणत असतील की अशी माणसं आमच्या नशिबात का आणून ठेवलीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


