येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरला सुरू होणार आहे.

लवकरच परतीचा पाऊस सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून हा पावसाचा प्रवास सुरु होणार असून राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

परतीचा प्रवास १७ सप्टेंबरला सुरु होणार 

पावसाचा परतीचा प्रवास हा १७ सप्टेंबरला सुरु होणार असून त्याची तारीख १७ सप्टेंबर घोषित करण्यात आली आहे. राजस्थानवर वातावरणाच्या खालच्या थरात जास्त दाबाचे क्षेत्र तयार होतानाच सलग पाच दिवस कोरडे हवामान नोंदले गेल्यास मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे जाहीर केले जाते. सर्वसाधारण तारखेच्या दोन दिवस आधीच परतीचा पाऊस सुरु होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.

कमी दाबाचे क्षेत्र झाले तयार 

'वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले.हे क्षेत्र पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण ओडिसा आणि दक्षिण छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे १३ सप्टेंबरला मराठवाड्यात, तर १४ आणि १५ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.

राज्यातील पावसात होणार वाढ 

राज्यातील पावसात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याचा सर्वसाधारण कालावधी ५ ते १४ ऑक्टोबर आहे. सध्याचे वातावरण पाहता पाऊस हा सर्वसाधारण वेळेत माघारी फिरण्याची शक्यता कमी प्रमाणात निर्माण झाली आहे. नागरिकांनी सावधानता बाळगावी असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.