MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Pune Railway Station Crowd Control: पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न! होळीला गावी जाताय? मग हे वाचाच...

Pune Railway Station Crowd Control: पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न! होळीला गावी जाताय? मग हे वाचाच...

Pune Railway Station Crowd Control: होळीच्या गर्दीला सामोरे जाण्यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने 'झिरो रिस्क' प्लॅन अंतर्गत एक 'होल्डिंग एरिया' तयार केला. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश न देता. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 24 2026, 05:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न!
Image Credit : social media

पुणे रेल्वे स्थानकावर 'गर्दी' मॅनेजमेंटचा नवा पॅटर्न!

पुणे : होळीचा सण म्हणजे आनंदाचा उत्साह, पण रेल्वे प्रवाशांसाठी मात्र हा काळ गर्दीच्या संघर्षाचा असतो. उत्तर भारतासह इतर राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांची होणारी तुफान गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे प्रशासनाने यंदा 'झिरो रिस्क' प्लॅन तयार केला आहे. रेल्वे स्थानकावर होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाचे बदल केले असून, प्रवाशांना आता एका विशेष सुविधेतून जावे लागणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
काय आहे रेल्वेचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'?
Image Credit : South Western Railways - SWR

काय आहे रेल्वेचा 'अ‍ॅक्शन प्लॅन'?

वाढत्या गर्दीमुळे स्थानकावर कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी प्रशासनाने 'होल्डिंग एरिया' ही संकल्पना राबवली आहे.

कुठे आहे ही व्यवस्था? स्थानकाच्या मुख्य प्लॅटफॉर्मलगत असलेल्या पार्सल विभागा शेजारी हा प्रशस्त होल्डिंग एरिया उभारण्यात आला आहे.

कोणासाठी? प्रामुख्याने उत्तर भारत आणि इतर लांब पल्ल्याच्या विशेष गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्मवर न सोडता, आधी या एरियात थांबवले जाईल.

का? प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि चेंगराचेंगरीसारखे प्रकार रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Related image1
पाप लपवण्यासाठी मृत्यूला मिठी! पुण्यात स्पा सेंटरवर छापा पडताच महिलेचा करुण अंत; मॅनेजरची अवस्था गंभीर!
Related image2
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा
35
प्रवाशांना मिळणाऱ्या हायटेक सुविधा
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवाशांना मिळणाऱ्या हायटेक सुविधा

प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी या होल्डिंग एरियात सर्व सोयी पुरवण्यात आल्या आहेत.

बसण्याची सोय व शेड: ऊन आणि पावसापासून संरक्षणासाठी मजबूत शेड आणि बसण्यासाठी आसनव्यवस्था.

डिजिटल अपडेट्स: तुमची ट्रेन किती वाजता येणार याची माहिती देण्यासाठी मोठे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड.

इतर सोयी: मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, पिण्याचे शुद्ध पाणी, फिरते शौचालय आणि पंख्यांची व्यवस्था.

सुरक्षा कवच: आरपीएफ (RPF) जवानांचा कडक बंदोबस्त आणि मदतीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती.

45
धडा घेतला जुन्या घटनेतून!
Image Credit : South Western Railways - SWR

धडा घेतला जुन्या घटनेतून!

काही वर्षांपूर्वी गर्दीमुळे गुदमरून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तो इतिहास पुन्हा घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. केवळ होळीच नाही, तर आगामी दिवाळी, दसरा आणि छठपूजेसाठीही हीच नियमावली लागू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

55
प्रवाशांना आवाहन
Image Credit : GEMINI AI

प्रवाशांना आवाहन

स्थानकावर गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक करत असलेल्या सूचनांचे पालन करा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Abhijeet Dipke : NDA मध्ये येण्याची ऑफर, पण महिन्याभरापूर्वी तर मी देशद्रोही होतो ना? अभिजीत दिपकेचा सवाल
Recommended image2
FDA Crackdown : शाळा-कॉलेजबाहेरच्या खाऊगल्ल्यांवर FDAचा वॉच, तुकाराम मुंढेंनी दिले कारवाईचे संकेत
Recommended image3
Pune Protest: पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Recommended image4
Pune Accident: बावधनमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Recommended image5
Anti-Conversion Law: महाराष्ट्रात 'धर्म स्वातंत्र्य कायदा' लागू होणार, तारीखही ठरली; जाणून घ्या काय आहेत तरतुदी
Related Stories
Recommended image1
पाप लपवण्यासाठी मृत्यूला मिठी! पुण्यात स्पा सेंटरवर छापा पडताच महिलेचा करुण अंत; मॅनेजरची अवस्था गंभीर!
Recommended image2
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी ओसरणार; रेल्वेकडून 'होळी स्पेशल' गाड्यांची घोषणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved