Pune Porsche Accident : "माझ्या मुलाची हत्या झालीय, आरोपीला कठोर शिक्षा द्या", अपघातातील मृत मुलाच्या आईने व्यक्त केल्या भावना

| Published : May 23 2024, 07:53 AM IST / Updated: May 23 2024, 08:00 AM IST

 Pune news
Pune Porsche Accident : "माझ्या मुलाची हत्या झालीय, आरोपीला कठोर शिक्षा द्या", अपघातातील मृत मुलाच्या आईने व्यक्त केल्या भावना
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Pune Porsche Accident :  पुण्यातील पोर्श कार अपघतामधील आरोपीला अपघातांवर निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी बाल हक्क न्यायालयाने आपल्या आदेशात बदल केले आहे. सदर आरोपीला आता 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

Pune Porsche Accident :  पुणे येथे रविवारी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने पोर्श कारने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. सध्या पुण्यातील पोर्श कार अपघाताचे प्रकरण अधिक तापले असून आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. अशातच अपघातात निधन झालेल्या मुलाच्या आईने मनाील दु:ख व्यक्त केले आहे. मृत मुलाच्या आईला अपघातातील आरोपी कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मृत मुलाच्या आईने आता उत्तर दिले आहे.

अनीश अवधियाची आई नक्की काय म्हणाली?
अपघातात निधन झालेल्या अनीश अवधियाची आई सविता यांनी म्हटले की, "त्याने माझ्या मुलाचा जीव घेतला आहे. माझा मुलगा माझ्यापासून दूर झालाय. आता कधीच त्याला भेटू शकत नाही मी."

पुढे सविता अवधिया यांनी म्हटले की, "आरोपी तरुणाची चूक आहे. याला हत्याही म्हणू शकतो. कारण आज त्याने एवढी मोठी चूक केली नसती तर कोणाचा जीवही गेला नसता. त्याच्या घरातील मंडळींनी त्याला असे करण्यापासून रोखले असते तर आज माझा मुलगा जीवंत असता. ही थेट हत्या असल्याचे दिसतेय."

आरोपीला कठोर शिक्षा मिळावी. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरोपीच्या घरातील मंडळी फार प्रयत्न करतायत. श्रीमंत आहेत म्हणून आपल्या मुलाला कसेही वाचवू शकतो असे आरोपीच्या घरातील विचार करत आहेत. पण मी माझ्या मुलाला गमावले आहे. माझा मुलगा 3 मे ला आम्हाला भेटण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी माझी अ‍ॅनिव्हर्सरी होती. यानंतर 5 मे ला आम्हाला भेटून निघून गेला. आई तुझ्यासाठी दुबईहून गिफ्ट आणलेय असेही मुलाने म्हटले होते. मी येईन त्यावेळी देईन. लवकरत येईन. पण तो कधीच आला नाही." अशा प्रकारच्या दु:खद भावना मृत अनीश अवधियाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.

आरोपीवर खटला चालवण्याची परवानगी द्यावी
बाल हक्क न्यायालयात 22 मे ला सुनावणी झाली. यावेळी आरोपीच्या वकिलांनी तो अल्पवयीन असल्याचे न्यायालायासमोर सांगितले. खरंतर, आरोपीने कार अपघताता दोन जणांना जीव घेतला असून ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे आरोपीवर खटला चावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रकरणाचा तपास करणारे पोलीस आणि शासकीय वकिलांनी केली आहे. कोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपीची 14 दिवस बालसुधारगृहाच रवानगी केली आहे. याशिवाय आरोपी सज्ञात आहे की अज्ञात याबद्दल पोलिसांच्या अधिक तपासानंतर ठरवण्यात असेही न्यायालयाने म्हटले आहे.

आणखी वाचा : 

बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने पार्टीत २ तासात उडवले चक्क ४८ हजार

Pune Porsche Crash: आताची मोठी बातमी, पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी