Pune Porsche Crash: आताची मोठी बातमी, पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी

| Published : May 22 2024, 05:44 PM IST / Updated: May 22 2024, 09:08 PM IST

porsche car accident case

सार

पुणे अपघात प्रकरणातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

पुणे हिट अँड रन अर्थात पुणे अपघात प्रकरणातील एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर याला तीन दिवस कोठडीत राहवं लागणार आहे.

या प्रकरणी पुणे पोलिसांकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. परंतु जामीन सत्र न्यायालयाकडून नामंजूर करत तीन दिवसांची कोठडी तिनही आरोपींना सुनावली आहे. या प्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवालसह तिघांना २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी वाचा :

'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने, विशाल अग्रवालवर शाई फेकली