सार

Pune Zika Virus Community Spread : पुण्यात झिका व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव झाला असून रुग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे.

 

Pune Zika Virus Community Spread : दिवसेंदिवस पुण्यात झिका व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. एरंडवणे येथील दोन गर्भवतींना आणि कोथरूडच्या एकाला झिकाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेकडून प्रादुर्भाव रोखण्यासाठी इनडोअर फॉगिंग करण्यात येत आहे. अशी माहिती महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी दिली आहे.

कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता?

पुण्यात झिकाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला, याचे धागेदोरे आरोग्य यंत्रणेला सापडत नाहीत. त्यामुळे कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये 46 वर्षांचा डॉक्टर आणि त्याच्या 15 वर्षांच्या मुलीला झिकाचं निदान झाले आहे. त्यानंतर मुंढवा येथे 47 वर्षांची एक महिला आणि तिच्या 22 वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाल्याचे समोर आले आहे.

झिका पुण्यात आला कुठून हा प्रश्न अनुत्तरीत

पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. डासांपासून हा आजार पसरत असल्याचे पाहायला मिळतंय. ऐन वारीच्या तोंडावर झिकाचे सात रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न अनुत्तरीत आहे.

झिका व्हायरसची लक्षणे कोणती?

ताप

सांधेदुखी

अंगदुखी

डोकेदुखी

डोळे लाल होणे

उलटी होणे

अस्वस्थता जाणवणे

अंगावर पुरळ उठणे

काळजी कशी घ्याल?

डासांपासून दूर राहणे

घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा.

पाण्याची डबकी होऊ न देणे

पाणी जास्त काळ साठवून ठेवू नका

घर आणि परिसर स्वच्छ ठेवा

मच्छरदाणीचा वापर करा

आणखी वाचा : 

Hathras Stempede: सत्संग स्थळी येण्यासाठी प्रवेश व बाहेर पडण्याचे दरवाजे होते अरुंद, दिली जात आहेत अनेक कारणे