सार
पिंपरी चिंचवडमधील काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय.
पुणे : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजारांचे अनुदान देणार ही घोषणा करणारे सरकार वारकऱ्यांच्याच जीवाशी खेळतंय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. या इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. मात्र आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घेतला नाही, तर एका ही सत्ताधारी नेत्याला आळंदीत फिरकू देणार नाही, असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी दिला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, आजही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून नदीत विष कालवतायेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार करु शकत नाही. ही मोठी शोकांतिका असल्याचंही बोललं जातंय. यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करुन वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावी लागणार आहे. यासाठी वारंवार मागणी करुनही सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आलंय. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त केला जातोय. इंद्रायणीला मोकळा श्वास निर्माण करून द्या, या वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत आलंय. त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थान संताप व्यक्त करतोय. याच अनुषंगाने आता इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी वारंवार आंदोलन छेडणाऱ्या आंदोलकांनी थेट सत्ताधारी नेत्यांना इशारा दिला आहे.
आणखी वाचा :