Reel Making Video: रिल्ससाठी इमारतीवरून तरुणीने केला जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल

| Published : Jun 20 2024, 07:33 PM IST / Updated: Jun 20 2024, 07:37 PM IST

pune girl hung from multi storey building

सार

Reel Making Video: तरूण मुलं रिल्ससाठी काय करतील याचा नेम नाही. स्वतःचा जीव धोक्यात टाकून रिल्स करणे हे त्यांना खूप किरकोळ गोष्ट वाटते आहे. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणे : पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील एका पडीक इमारतीच्या छताला लटकून जीव धोक्यात घालून एका मुलीने रील बनवले आहे. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे. व्हिडिओमध्ये मुलगी छताला लटकलेली असून तिने एका मुलाचा हात पकडला आहे. हा व्हिडिओ एका वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला शूट करण्यात आला आहे.

 

 

ही बेफिकर जोडी शॉर्टफिल्मचे शूटिंग करत होती की सोशल मीडिया रील हे स्पष्ट झाले नाही. धोकादायक स्टंटसाठी आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव व्हिडिओमध्ये जाणवत होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर येताच त्यावर जोरदार टीका झाली. “ सध्याच्या काळात किशोरवयीन मुलांच्या हातात मोबाईल आल्याने फेमस होण्यासाठी देव जाणे ते कोणत्या थराला जाऊ शकतात, हे अजून आपल्याला पाहायचे शिल्लक आहे का? ,” असे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे. युजर्सने या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला, कारण निष्काळजीपणामुळे मुलीचा जीव गंभीरपणे धोक्यात येऊ शकतो. या व्हिडिओने सोशल मीडियावर पटकन लक्ष वेधले, परंतु टीकाही तितकीच तीव्र होती. स्टंट करताना मुलगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी अवलंबलेली धोकादायक कृती ही जीवाचा थरकाप उडवून देणारी आहे.