- Home
- Maharashtra
- Khandoba Temple : खंडोबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
Khandoba Temple : खंडोबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
- FB
- TW
- Linkdin
खंडोबा मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता लवकरच अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी याबाबत निर्देशही दिले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर (Khandoba Temple) हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या देखील भलीमोठी आहे.
त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला अन्य भाविकांची मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची (Modern Elevators) सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (14 फेब्रुवारी) दिले आहेत.
यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हणाले की, "निमगाव येथील खंडोबा मंदिर (Khandoba Temple) उंचावर असल्याने या ठिकाणी भाविकांना सहजपणे जाता येण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी रोपवेची (Ropeway) मागणी केली होती. त्याठिकाणी रोपवेची योग्य उभारणी करता येत नसल्याने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highway Authority Of The Central Government) लिफ्ट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
लिफ्टसह इतर सुविधांसाठी केंद्र सरकारच्या (Central Government) केंद्रीय राखीव निधीमधून निधी देण्यास मंजुरी मिळाली आहे. भाविकांना चांगल्या सोयीसुविधा दिल्यास येथे चांगले पर्यटनस्थळ (Tourist Spot) निर्माण होऊ शकते.
या सुविधांच्या उभारणीसाठी शासकीय जागेची आवश्यकता आहे. सार्वजनिक हितासाठी येथील जमिनीचा वापर होत असल्याने राज्य शासनाने जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) नि:शुल्क जमीन उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी. संबंधित यंत्रणेने लिफ्टची सुविधा करताना सर्व खबरदारी घ्यावी, त्याची देखभाल दुरूस्ती पाहावी", असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
निमगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj Memorial), भक्त निवास, अॅम्फी थिएटर, बगीचा, पार्किंग, कार्यालय, प्रसादालय, स्वच्छतागृहे, स्कायवॉक (Skywalk) उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. लिफ्टमधून दिव्यांग, वृद्ध, महिला, बालके यांना प्राधान्य देण्यात येणार असून एकावेळी 26 नागरिकांना लिफ्टमधून जाता-येता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आणखी वाचा
अमेरिकेत आढळला Bubonic प्लेगचा रुग्ण, एकेकाळी या महामारीमुळे 50 दशलक्ष लोकांचा गेलाय बळी