सार

RRB Technician Recruitment 2024:रेल्वे भरती बोर्डतर्फे टेक्निशिअन ग्रेड-1सिग्नल पदासाठी 1 हजार 100 जागा व टेक्निशिअन ग्रेड 3 पदासाठी 7 हजार 900 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे. 9 मार्चपासून अर्ज प्रक्रियेस सुरुवात होईल. 

RRB Technician Recruitment 2024 : रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलटच्या पाच हजार जागांवरील भरती प्रक्रियेनंतर आता रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) टेक्निशिअन पदाकरिता 9 हजार जागांवर भरती करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याद्वारे अर्ज करण्याच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 9 मार्च 2024 पासून सुरू केली जाईल.

रेल्वे टेक्निशिअन भरतीमध्ये नोंदणी करू इच्छिणारे सर्व उमेदवार भारतीय रेल्वेच्या indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 8 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

RRB Recruitment 2024: भरती प्रक्रिया तपशील

भारतीय रेल्वेतर्फे या भरती प्रक्रियेद्वारे टेक्निशिअन पदाकरिता एकूण 9 हजार रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये टेक्निशिअन ग्रेड 1 सिग्नलच्या 1 हजार 100 पदांवर आणि टेक्निशियन ग्रेड 3च्या 7 हजार 900 रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

Railway Technician Vacancy 2024: पात्रता आणि निकष

  • या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी NCVT/SCVT मान्यताप्राप्त संस्थेतून SSLC किंवा ITI विषयामध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • टेक्निशिअन ग्रेड 1 सिग्नलच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वय 36 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
  • टेक्निशिअन ग्रेड 3च्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी कमाल वय 33 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
  • 1 जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाईल.

RRB Technician Vacancy 2024: अर्ज शुल्क

  • RRB टेक्निशिअन भरती 2024 करिता अर्ज दाखल करण्यासोबतच उमेदवाराला निश्चित करण्यात आलेले शुल्क देखील जमा करावे लागेल.
  • शुल्क जमा केल्यानंतरच उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाईल.
  • अन्य सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
  • SC, ST, माजी सैनिक, PWBD, ट्रान्सजेंडर, EWS आणि महिला उमेदवारांकडून 250 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

RRB टेक्निशिअन पगार (अपेक्षित) (RRB Technician Salary)

वेगवेगळ्या टेक्निशिअन पदांनुसार आवश्यक कौशल्य आणि जबाबदाऱ्यांनुसार आधारित वेतनश्रेणी आहेत…

  • टेक्निशिअन ग्रेड 1 सिग्नल - वेतनश्रेणी 5 अंतर्गत 29 हजार 200 रुपये (अपेक्षित)
  • टेक्निशिअन ग्रेड 3 - वेतनश्रेणी 2 अंतर्गत 19 हजार 900 रुपये (अपेक्षित)

ऑनलाइन कसा करावा अर्ज? जाणून घ्या

  • आरआरबीच्या संकेतस्थळास भेट द्या https://www.recruitmentrrb.in
  • ऑनलाइन अर्जाची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा
  • प्रथमच अर्ज करत असल्यास नोंदणी करा किंवा आपले अकाउंट तयार करा
  • नोंदणी केल्यानंतर लॉग इन करा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव (लागू असल्यास) यासारखी माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी
  • डॉक्युमेंट्स, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे इत्यादी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा
  • उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरावे
  • पुन्हा एकदा सर्व माहिती तपासा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा

आणखी वाचा

जगातील सर्वोत्कृष्ट डिजिटल अर्थव्यवस्था उभारण्यात भारत यशस्वी, नोबेल पारितोषिक विजेते A Michael Spence यांनी केले कौतुक

PF Interest Rate : नोकरदारांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता PF खात्यावर मिळणार इतके टक्के व्याज

VIDEO : चिखलात अडकलेल्या BJP नेत्याची सुटकेसाठी धडपड, म्हणाले-'आज JCBची परीक्षा होती'