- Home
- Maharashtra
- Pune Parking Update: गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात 27 ठिकाणी पार्किंगची खास सुविधा, पाहा तुमच्या परिसरात कुठे आहे पार्किंग!
Pune Parking Update: गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात 27 ठिकाणी पार्किंगची खास सुविधा, पाहा तुमच्या परिसरात कुठे आहे पार्किंग!
Pune Parking Update : पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणाऱ्या गर्दीच्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून, वाहतूक पोलिसांनी शहरात 27 ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था केली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध केली.

पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा आणि वाहतूक कोंडीचा विचार करून, पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचं उत्कृष्ट नियोजन केलं आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शहरभर 27 ठिकाणी पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या ठिकाणांचा योग्य वापर केल्यास, मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहणार असून भाविकांनाही कोणताही त्रास होणार नाही, असं वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या पार्किंग ठिकाणी दुचाकींसोबत काही ठिकाणी चारचाकी वाहनांसाठीही स्वतंत्र पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक अथवा या पार्किंगचा वापर करावा, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
पुण्यातील अधिकृत पार्किंग ठिकाणांची यादी (दुचाकी/चारचाकी):
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
निलायम टॉकीज – (चारचाकी)
शिवाजी आखाडा वाहनतळ
देसाई कॉलेज – पोलिस पार्किंग 17
विमलाबाई गरवारे हायस्कूल
हमालवाडा, पत्र्या मारुती चौकाजवळ – (चारचाकी)
आबासाहेब गरवारे कॉलेज – (चारचाकी)
संजीवनी मेडिकल कॉलेज मैदान – (चारचाकी)
गोगटे प्रशाला
आपटे प्रशाला
फर्ग्युसन कॉलेज – (चारचाकी)
एसएसपीएमएस, शिवाजीनगर – (चारचाकी)
जैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता – (चारचाकी)
एस.पी. कॉलेज – (चारचाकी)
मराठवाडा कॉलेज
पीएमपीएमएल मैदान, पुरम चौकाजवळ – (चारचाकी)
पेशवा पथ
रानडे पथ
पेशवे पार्क, सारसबाग
हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक
काँग्रेस भवन रस्ता
पाटील प्लाझा पार्किंग
पर्वती ते दांडेकर पूल
दांडेकर पूल ते गणेशमळा
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता – (चारचाकी)
नदी पात्र, भिडे ते गाडीतळ पूल – (चारचाकी)
गणेशमळा ते राजाराम पूल
या नियोजनामुळे गणेश भक्तांना विसर्जन मिरवणूक अधिक आनंददायी आणि अडथळेमुक्त अनुभवता येणार आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

