Pune drunk and drive News : पोलिसांचा मोठा निर्णय, पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स होणार रद्द

| Published : Jul 10 2024, 12:39 PM IST / Updated: Jul 10 2024, 12:43 PM IST

drunk and drive

सार

Pune drunk and drive News : पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलायला सुरुवात झाली आहे.

Pune drunk and drive News : पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक भीषण अपघात घडले आहेत. यातील अनेक अपघात दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

गेल्या 6 महिन्यात 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल

पुण्यात गेल्या 6 महिन्यात 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर 6 महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

पुण्यात नेमके चाललंय काय?

विद्येचे माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमके चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणेकर सोडाच पण पुण्याती पोलीस तरी सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता कायम असतानाच काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर चेकींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच आता चेक पॉईंटवर गाडी अडवल्याचा राग आल्यानं नोकरी कशी करतोस, तेच बघतोच, असं म्हणत थेट पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुणं सुरक्षित तर आहे ना? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.

आणखी वाचा :

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Konkan Railway Updates : कोकण रेल्वे बुधवारीही विस्कळीतच, मुंबईतून सुटणाऱ्या 13 एक्स्प्रेस रद्द