Pune Accident : पुण्यात वाहनांची धडक होऊन भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

| Published : Dec 18 2023, 11:41 AM IST / Updated: Dec 26 2023, 01:17 PM IST

accident

सार

Pune Accident News : पुण्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाली माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

Pune Accident News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रविवारी (17 डिसेंबर 2023) भीषण अपघात (Pune Accident) झाला. कल्याण-नाशिक महामार्गावर (Kalyan-Nashik highway) पिकअप व्हॅन आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

डिंगोरे गावाच्या हद्दीतील अंजिराची बाग परिसरात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुले, एक महिला आणि पाच पुरुषांची समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याचेही म्हटले जात आहे. 

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले. तसंच अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

उपमुख्यमंत्री तसचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांप्रति श्रद्धांजली देखील वाहिली. "अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून कर्तव्य बजावावे तसेच वाहनचालकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत", असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आणखी वाचा

Parking Rules : मुंबईत अवैधरित्या गाडी पार्क करणाऱ्यांवर होणार कारवाई, महापालिकेचा मोठा निर्णय

Mumbai Deep Cleaning Drive : मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेसाठी जुहू चौपाटीवर स्वतः चालवलं क्लिनिंग मशीन

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?