राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दलचे अपडेट समोर आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

Pratap Sarnaik Health Update : राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आल्यामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

प्रताप सरनाईक हे मागील काही दिवसांपासून परिवहन खात्याच्या कामात व्यस्त होते. त्यांच्या जवळ धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी तसेच शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणूनही कामकाज सुरू होते. दोन-तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी बुधवारी सायंकाळी स्वतःहून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची विविध चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ताप असल्याचे निदान झाले. त्यानंतर कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइड यांसारख्या आजारांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तापामुळे त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, “प्रताप सरनाईक सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही.”म्हणूनच त्यांच्या तब्येतीबाबत चिंतेचे कारण नाही आणि ते लवकरच बरे होऊन पुन्हा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज होतील, अशी अपेक्षा आहे.

प्रताप सरनाईक यांच्या कामाबद्दल थोडक्यात....

“एसटी बस तुमच्या शाळेत” मोहिम

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असतानाही सरनाईक यांनी “एसटी बस तुमच्या शाळेत” ही सार्वजनिक वाहतूक सेवा शाळांपर्यंत पोहोचवण्याच्या मोहिमेला चालना दिली आहे. त्यांचा हेतू ‘लोकांचे वाहन’ लोकांच्या जवळी नेण्याचा आहे.

एसटी महामंडळात मोठी बस खरेदी आणि भरती

सरकारच्या निर्णयानुसार आता दरवर्षी 5,000 नवीन बस, ज्यात 1,000 स्मार्ट ई–बसाही असणार आहेत. त्याचबरोबर एसटी चे नवे कर्मचारी भरतीचेही मार्ग प्रशस्त होत आहेत — हे भविष्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले आहेत

एसटी अनधिकृत थांब्यांवर कारवाई

१२ जून रोजी सरनाईक यांनी थेट एसटीच्या अनधिकृत हॉटेल स्टॉपवर अचानक तपासणी करून अधिकार्‍यांना कठोर सूचना दिल्या. भविष्यात अशी गैरव्यवस्था होणार नाही याबाबत ठोस आदेश देऊन प्रशासनात गडबड निर्माण केली.

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आक्रमक भूमिका

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्यावर सरनाईक स्वतः दर ५ तारखेला वित्त विभागाकडे जाण्याचे आदेश दिले; पगार वेळेवर मिळावा यासाठी दृढ भूमिका घेतली.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.