सार

Radhakrishna Vikhe Patil : भारताने विश्वकप जिंकला हा भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचे राधाकृष्ण विखेंनी म्हटले.

 

Radhakrishna Vikhe Patil : भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीम इंडियाचे कौतुक केले असून भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभेची जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभेची निवडणूक ताकदीने जिंकणार

जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भारताने विश्वकप जिंकला हा सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारतीय संघाचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे अभिनंदन करतो. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election) त्याच ताकदीने जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 आणखी वाचा : 

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कसा करायचा अर्ज?, महिलांना महिन्याला मिळणार 1500 रुपये