महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदांवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद होत आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. नाशिकमध्ये मंत्री नीतेश राणे यांना एका शेतकऱ्याने कांद्याचा हार घालून आपला निषेध व्यक्त केला.
छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून शिवसेना-यूबीटी नेते सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भुजबळांचा लढा पदासाठी असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्रीपदांवरून वाद सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक मंत्री असल्याने त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.
पुणे येथे फूटपाथवर झोपलेल्या काही जणांना एका डंपरने चिरडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जातेय.