MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • बालाजी भक्तांसाठी खुशखबर! अमरावती–तिरुपती एक्स्प्रेसला मोठी मुदतवाढ; 29 जानेवारी 2026पर्यंत धावणार

बालाजी भक्तांसाठी खुशखबर! अमरावती–तिरुपती एक्स्प्रेसला मोठी मुदतवाढ; 29 जानेवारी 2026पर्यंत धावणार

Amravati–Tirupati Express Update: तिरुपती बालाजी दर्शनासाठी लोकप्रिय असलेली अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस (12766/12765) आता २९ जानेवारी २०२६ पर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या प्रचंड प्रतिसादामुळे या सेवेला मुदतवाढ दिली आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 26 2025, 03:43 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बालाजी भक्तांसाठी खुशखबर!
Image Credit : iSTOCK

बालाजी भक्तांसाठी खुशखबर!

Amravati–Tirupati Express Update: तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीला लक्षात घेता सुरू करण्यात आलेली अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस (12766/12765) अल्पावधीतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. सुरुवातीला मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात आलेल्या या गाडीची मुदत आता संपली असली तरी प्रवाशांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने या सेवेला 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे भक्तांना आणि नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अमरावतीवरून सुटण्याची वेळ पूर्ववत
Image Credit : our own

अमरावतीवरून सुटण्याची वेळ पूर्ववत

अमरावती, अकोला, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांतील प्रवासी या गाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस (12766) आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार सकाळी 6.45 वाजता अमरावतीहून सुटते व 8.00 वाजता अकोल्यात पोहोचते. दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता गाडी तिरुपती स्थानकात दाखल होते. 

Related Articles

Related image1
26/11 हल्ल्यातील 10 हिरो, ज्यांनी प्राणांची आहुती देत वाचवले हजारो निष्पाप जीव!
Related image2
26/11 मुंबई हल्ल्याची A टू Z कहाणी, भयाचे ते 60 तास, संपूर्ण देश वेठीस आणि भारताच्या 4 गंभीर चुका!
35
परतीच्या प्रवासाची वेळ
Image Credit : social media

परतीच्या प्रवासाची वेळ

तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस (12765) मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 3.45 वाजता तिरुपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 3.10 वाजता अमरावतीत पोहोचते. 

45
प्रवाशांच्या मागणीनंतर पुन्हा अमरावतीहून सुरू
Image Credit : AI Generated Photo

प्रवाशांच्या मागणीनंतर पुन्हा अमरावतीहून सुरू

काही काळ या गाडीचा प्रारंभ अकोला करण्यात आल्याने अमरावतीतील चाकरमानी, विद्यार्थी तसेच भाविकांना मोठी गैरसोय होत होती. मात्र, सततच्या मागणीमुळे मध्य रेल्वेने पुन्हा ही एक्स्प्रेस अमरावती येथूनच सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी तसेच तिरुपतीकडे जाणाऱ्यांसाठी सुविधा अधिक सुकर झाल्या आहेत. 

55
भाविकांची पहिली पसंती ठरलेली सेवा
Image Credit : our own

भाविकांची पहिली पसंती ठरलेली सेवा

तिरुपती दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ही एक्स्प्रेस सर्वाधिक पसंत केली जाते. दर्शन आटोपल्यानंतर मंगळवार व शनिवारच्या दिवशी परतीची सोय उपलब्ध असल्याने भक्तांचा प्रवास अत्यंत सोयीस्कर ठरतो.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nalasopara news : वाढदिवसानिमित्त केक आणला, कापलाही.... खाताना केकमध्ये मेलेली पाल दिसली, ८ जण रुग्णालयात दाखल
Recommended image2
Food Safety : कल्याणमध्ये आईस्क्रीमच्या क्रेटमध्ये जिवंत उंदीर, VIDEO व्हायरल; नागरिकांमधून कारवाईची मागणी
Recommended image3
Swades : शाहरुखच्या सिनेमाने आयुष्य बदललं, अमेरिकेतून परतलेल्या अभिजीत दिपकेने गावात सुरू केली चळवळ
Recommended image4
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदासाठी झिशान सिद्दीकींचे नाव आघाडीवर; पक्षात नाराजीची चर्चा
Recommended image5
पुण्यात FDA चा मोठा दणका! कॅम्पमधील प्रसिद्ध Burger King वर कारवाई; परवाना रद्द
Related Stories
Recommended image1
26/11 हल्ल्यातील 10 हिरो, ज्यांनी प्राणांची आहुती देत वाचवले हजारो निष्पाप जीव!
Recommended image2
26/11 मुंबई हल्ल्याची A टू Z कहाणी, भयाचे ते 60 तास, संपूर्ण देश वेठीस आणि भारताच्या 4 गंभीर चुका!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved