- Home
- Maharashtra
- Mahaparinirvan Din Special Trains: महापरिनिर्वाण दिनासाठी प्रवाशांना दिलासा! मुंबई–नागपूर–अमरावती–अकोला मार्गावर रेल्वेच्या विशेष गाड्या; वेळापत्रक जाहीर
Mahaparinirvan Din Special Trains: महापरिनिर्वाण दिनासाठी प्रवाशांना दिलासा! मुंबई–नागपूर–अमरावती–अकोला मार्गावर रेल्वेच्या विशेष गाड्या; वेळापत्रक जाहीर
Mahaparinirvan Din Special Trains : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी विशेष अनारक्षित गाड्यांची घोषणा केली. या गाड्या ४ डिसेंबरपासून नागपूर, अमरावती, अकोल्यातून सुटणार असून CSMT धावतील

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांना दिलासा!
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल होणाऱ्या अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर, अमरावती आणि अकोला या मार्गांवर विशेष अनारक्षित गाड्यांचे संचालन करण्याची घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. 4 डिसेंबरपासून या गाड्यांची सुरुवात होणार असून मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.
नागपूर–मुंबई विशेष गाड्या (CSTM–Nagpur Special)
1) गाडी क्रमांक 01260
सुरुवात: नागपूर – 4 डिसेंबर, सायं. 6:15
पोहोच: मुंबई CSMT – पुढील दिवशी सकाळी 10:55
2) गाडी क्रमांक 01262
सुरुवात: नागपूर – 4 डिसेंबर, रात्री 11:55
पोहोच: मुंबई CSMT – पुढील दिवशी दुपारी 3:05
3) गाडी क्रमांक 01264
सुरुवात: नागपूर – 5 डिसेंबर, सकाळी 8:00
पोहोच: मुंबई CSMT – त्याच दिवशी रात्री 11:45
4) गाडी क्रमांक 01266
सुरुवात: नागपूर – 5 डिसेंबर, सकाळी 6:15
पोहोच: मुंबई CSMT – पुढील दिवशी सकाळी 10:55
या गाडीचे थांबे
अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर.
मुंबई–नागपूर परतीच्या विशेष गाड्या (Mumbai–Nagpur Special)
1) गाडी क्रमांक 01249
सुरुवात: मुंबई CSMT – 6 डिसेंबर, रात्री 8:50
पोहोच: नागपूर – पुढील दिवशी सकाळी 11:20
2) गाडी क्रमांक 01253
सुरुवात: दादर – 7 डिसेंबर, मध्यरात्री 12:40
पोहोच: नागपूर – त्याच दिवशी दुपारी 4:10
3) गाडी क्रमांक 01251
सुरुवात: मुंबई – 7 डिसेंबर, सकाळी 10:30
पोहोच: नागपूर – पुढील दिवशी 12:55 (मध्यरात्र)
4) गाडी क्रमांक 01255
सुरुवात: मुंबई – 7 डिसेंबर, दुपारी 12:35
पोहोच: नागपूर – पुढील दिवशी पहाटे 3:00
5) गाडी क्रमांक 01257
सुरुवात: मुंबई – 8 डिसेंबर, मध्यरात्री 12:20
पोहोच: नागपूर – त्याच दिवशी संध्याकाळी 4:10
सामान्य थांबे
दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम, अजनी.
अमरावती–मुंबई विशेष अनारक्षित गाड्या
गाडी क्रमांक 01218
सुरुवात: अमरावती – 5 डिसेंबर, सायं. 5:45
पोहोच: मुंबई CSMT – पुढील दिवशी पहाटे 5:45
गाडी क्रमांक 01217
सुरुवात: मुंबई CSMT – 7 डिसेंबर, मध्यरात्री 12:40
पोहोच: अमरावती – त्याच दिवशी दुपारी 12:50
भाविकांसाठी मोठी सुविधा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबईकडे प्रवास करतात. त्यामुळे गर्दीचा ताण कमी करण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी या विशेष अनारक्षित गाड्या मोठा दिलासा देणार आहेत.
