राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन पंप खरेदीवर 90% अनुदान जाहीर केले. या योजनेद्वारे अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी 10 HP क्षमतेपर्यंतच्या पंपसंचासाठी कमाल 40,000 रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात 

Sinchan Pump Anudan Yojana: शेतकऱ्यांना विहिरीतून किंवा शेततळ्यातून पाणी सहज उपसता यावे आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पंपसंच खरेदीवर 90% पर्यंत अनुदान देण्यात येत असून, शेतकऱ्यांना कमाल 40,000 रुपये अनुदानाचा लाभ मिळू शकतो.

कशासाठी मिळणार अनुदान?

योजनेअंतर्गत शेतकरी 10 HP क्षमतेपर्यंतचे डिझेल किंवा इलेक्ट्रिक पंपसंच खरेदी करू शकतात.

या उपक्रमाचा उद्देश

शेतकऱ्यांना पाण्याच्या स्त्रोतांपर्यंत सहज पोहोच मिळवून देणे

खर्चिकदृष्ट्या फायदेशीर सिंचनाची सुविधा उपलब्ध करणे

सिंचन व्यवस्थेमुळे शेती उत्पादनात लक्षणीय वाढ घडवणे

विशेषतः विहिरी, शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर केलेल्या जलसाठ्यां असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे फायदे

90% अनुदानामुळे आर्थिक भार कमी

विहीर/तळ्यांमधून पाणी काढणे सोपे, जलद आणि कार्यक्षम

पिकांना वेळेवर पाणी, उत्पादन वाढ आणि गुणवत्तेत सुधारणा

आधुनिक पंप प्रणालीमुळे पाण्याची बचत, टंचाईवर नियंत्रण

योजनेसाठी पात्रता निकष

अर्जदार अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी असावा

अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर

BPL शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य, तसेच त्यांच्यासाठी जमीन क्षेत्राची मर्यादा नाही

इतर शेतकऱ्यांकडे 0.40 ते 6 हेक्टर जमीन असणे आवश्यक

दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल, तर संयुक्त अर्ज सादर केल्यास लाभ मिळू शकतो

सर्व कृषी योजनांसाठी Farmer ID अनिवार्य

आवश्यक कागदपत्रे

शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)

जात प्रमाणपत्र

आधार लिंक असलेले बँक खाते

BPL प्रमाणपत्र (असल्यास)

महत्त्वाचे: Farmer ID असल्यास 7/12 उतारा, 8-A उतारा किंवा आधार कार्ड वेगळे देण्याची आवश्यकता नाही.

अर्ज कसा कराल?

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.

अर्जासाठी संकेतस्थळ: mahadbt.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.