शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्या दोन व्यक्ती भेटल्याचा दावा केला आहे. पवारांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही या दाव्याला दुजोरा दिला आहे.
राज्य सरकारकडून महाराष्ट्र मेड लिकरसाठी नव्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. याशिवाय IMFL वरील उत्पादन शुल्कातही वाढ आधी करण्यात आली आहे.
मुंबई-नागपूर विशेष ट्रेनला सीएसएमटी येथे येण्यासाठी सहा तास उशिर झाल्याने नागरिक संतप्त झाले. एवढेच नव्हे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली होती.
रक्षाबंधनच्या दिवशी, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळपासूनच मान्सून जोरदार पडत आहे. गेल्या काही दिवसांत पावसाची कमतरता जाणवली होती, मात्र रक्षाबंधनच्या दिवशी पाऊस पडल्याने वातावरणात नवीन उर्जा आली आहे.
मुंबई - रक्षाबंधन हा सण 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. अनेक राज्यांमध्ये हा दिवस सार्वजनिक आणि बँक सुट्टी म्हणून ओळखला जातो. जर तुम्ही आर्थिक कामकाज किंवा प्रवासाची योजना करत असाल, तर सणानिमित्त बँका बंद राहणार अशा शहरांची ही थोडक्यात यादी आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मधुरी' हत्तीणीबाबत PETA च्या मागण्यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्याने हत्तीणीच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था केली असल्यास, तिला कुठे ठेवायचे हे ठरवण्याचा अधिकार PETA ला नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांसाठी अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि देखरेख प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये नवीन पोलीस ठाणी, एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्र, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
मुंबई - शुक्रवारी (८ ऑगस्ट) सकाळी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या शुल्कांमुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली. शुल्क वाढीच्या धोक्याबरोबरच डॉलरच्या कमजोरीमुळेही सोन्याला आधार मिळाला.
मुंबई - शनिवारी (दि. ९ ऑगस्ट) रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्याला या निमित्ताने पुन्हा बळकटी प्राप्त होणार आहे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्साग्राम पोस्ट आणि मेसेज.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी आमची पूर्ण झाली असून, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा ठाम निर्धार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीदरम्यान व्यक्त केला.
Maharashtra