Pro Govinda 2024 : 'प्रो गोविंदा'च्या माध्यमातून गोविंदा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यंदा श्रीकृष्णाजन्माष्टमीचा सण 26 ऑगस्टला असून दही हंडी 27 ऑगस्टला असणार आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर ऐवजी डिसेंबरमध्ये होण्याची शक्यताय. यामागे 'लाडकी बहीण' योजनेचा प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा, हा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरमध्ये निवडणूक झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांना सुनियोजित पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि मला अटक करायची होती, असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगावात काळे झेंडे दाखवण्यात आले. तर, श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच, बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली.