मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण सुरू केले असून त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. जरांगे यांनी मंत्रिमंडळावर टीका केली आहे.
मुंबई: मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषणाला आझाद मैदानावर सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे मनोज जरंगे यांच्यासोबत मोठ्या संख्येने मुंबईला आले आहेत. संपूर्ण मुंबई त्यामुळं जाम करण्यात आली आहे. यावेळी उपोषण सुरु होताच अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांनी जरांगे यांची भेट घेतली.
या पार्श्वभूमीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. हाके यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी, आम्ही आजपर्यंत म्हणायचो विरोधी पक्ष सामील असेल, पण मी आता जबाबदारीने सांगतो. सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षाचे जसे आमदार, खासदार सामील आहेत तसेच अजित पवारांचे आमदार, खासदारही यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगत आहे.
जरांगे काय म्हणाले?
मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार अजित पवार ज्या दिवशी जरांगे यांच्याकडून आई माई काढली त्याच्याशी सहमत आहेत का? तुम्ही कायद्याचं आणि संविधानचं बोला, ज्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला त्यांना ओबीसी आंदोलनाचं काय करायचं, अजित पवार त्यांना पाठींबा देतायेत, मुख्यमंत्र्यांना ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असाही त्याच्या अर्थ निघत आहे.
आम्हालाही आता सज्ज झालं पाहिजे, सरकार जरांगे सारख्या माणसाला पायघड्या घालत असेल तर आम्हालाही भूमिका घ्यायला पाहिजे, असं हाके यांनी म्हटलं आहे. हाके पुढं बोलताना म्हटलं आहे की, जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार सरकार अस्वस्थ आणि बदण्याचा प्रयत्न करतायेत. आरक्षण हा विषय नाही, जरांगे यांची ही मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील ओबीसींचं आरक्षण संपलं असेल, असेओबीसींचं आरक्षण हे शासन, राज्यकर्त्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी आहे, असं हाके यांनी म्हटलं आहे.
