MHADA Pune Lottery 2025: म्हाडाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत 6,168 घरांसाठी सोडत जाहीर. 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार. अर्जासाठी आधार कार्ड आणि पॅनकार्ड डिजिलॉकरवरून संलग्न करणे अनिवार्य.
Banjara Reservation: धाराशिव जिल्ह्यातील मुरूम गावात पवन गोपीचंद चव्हाण या 32 वर्षीय बेरोजगार पदवीधर युवकाने बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे या मागणीसाठी जीवन संपवलं. जालना येथील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अपात्र अर्जदारांना हप्ता मिळणार नाही. पात्र असूनही हप्ता न मिळाल्यास, स्टेटस तपासून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.
कॉफी आयलंडने व्हिटा नोव्हाशी भागीदारी करून पुण्यातील अमनोरा मॉल आणि ट्रायबेका हायस्ट्रीट येथे दोन कॅफे उघडून महाराष्ट्रात पदार्पण केले आहे. यामुळे पुण्यात युरोपियन कॉफी संस्कृतीचा अनुभव मिळणार आहे.
Roosh Sindhu मिस इंटरनॅशनल इंडिया २०२५चा किताब जिंकल्यानंतर, रूश सिंधूचे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले. कुटुंबीय, मित्र आणि चाहते तिचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी एशिया कप २०२५ सामन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार देशभक्तीसोबत राजकारण आणि व्यवसाय मिसळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरला सुरू होणार आहे.
Infertility Update : पुरुष वंध्यत्वाचा दुर्मिळ प्रकार म्हणजे CAVD ज्यामध्ये शुक्राणू वाहून नेणाऱ्या नळ्या जन्मजात नसतात. यात आईकडून मुलाकडे जाणाऱ्या ADGRG2 नावाच्या जनुकाचाही समावेश असून, यामुळे या आजाराचे नवे पैलू स्पष्ट होत आहेत.
Union Minister Nitin Gadkari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे 'ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुला'चे लोकार्पण करण्यात आले.
SpiceJet कंपनीच्या प्रवासी विमानाचे उड्डाणादरम्यान एक चाक गुजरातच्या धावपट्टीवर आढळून आले. हे विमान मुंबईला जात होते. त्यामुळे मुंबई विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली.
Maharashtra