- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: 'या' लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० मिळणार नाहीत, कारण जाणून घ्या! असे करा पेमेंट स्टेटस चेक
Ladki Bahin Yojana: 'या' लाडक्या बहिणींना ऑगस्टचे ₹१५०० मिळणार नाहीत, कारण जाणून घ्या! असे करा पेमेंट स्टेटस चेक
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अपात्र अर्जदारांना हप्ता मिळणार नाही. पात्र असूनही हप्ता न मिळाल्यास, स्टेटस तपासून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली असून, अनेक महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. मात्र, काही महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत आणि लाखो महिलांना तर यंदा हप्ता मिळणारच नाही.
कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत?, जाणून घ्या
लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 2.5 कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, अर्जाच्या पडताळणीत काही महिलांनी दिलेली माहिती अयोग्य किंवा अपूर्ण आढळून आली आहे. त्यामुळे तब्बल 26 लाख अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना योजनेचा फायदा मिळणार नाही.
पैसे न मिळण्यामागची कारणं कोणती?
वयोमर्यादा: 21 ते 65 वयोगटातील महिलाच पात्र आहेत. त्यापेक्षा जास्त वय असलेल्या अर्जदारांना वगळण्यात आलंय.
कुटुंबाचं उत्पन्न: 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.
सरकारी नोकरी: जर महिला स्वतः सरकारी नोकरीत असेल, तर तिला योजनेचा लाभ मिळणार नाही.
चारचाकी वाहन: ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी आहे, अशा महिलांनाही लाभ नाकारण्यात येईल.
कुटुंबातील सदस्यसंख्या: एका कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
तुमचा हप्ता आला का? असा करा Payment Status Check
जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील, तर खाली दिलेल्या पद्धतीने स्टेटस तपासा
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" या सेक्शनवर क्लिक करा.
"Check Payment Status" वर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक आणि लाभार्थी आयडी (Beneficiary ID) टाका.
तुम्हाला तुमचं पेमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
याचसोबत तुमच्या बँक खात्यात पैसे आलेत की नाही हेही एकदा मोबाईल अॅप किंवा बँकेच्या एसएमएसद्वारे तपासा.
हे तुम्ही करा
जर तुमचं पात्रता असतानाही पैसे मिळाले नसतील, तर आपल्या स्थानीय अंगणवाडी केंद्र किंवा तालुका महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा. कोणतीही त्रुटी असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या.

