Targhar Railway Station Opening Date : नवी मुंबईतील नेरूळ-बेलापूर मार्गावर तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन रेल्वे स्थानके लवकरच सुरू होणार आहेत. ठाणे रेल्वे प्रशासनाने या स्थानकांना मंजुरी दिली असून, निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर लोकल सेवा सुरू होईल.
Tenant Land Purchase Price In Maharashtra : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानुसार, कुळाच्या जमिनीची खरेदी किंमत शेतजमीन न्यायाधिकरणाद्वारे ठरवली जाते. ही किंमत संरक्षित कुळ, साधे कुळ या प्रकारांनुसार खंडाची रक्कम आणि इतर घटकांवर अवलंबून असते.
Pune Mumbai Train Disruption : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात लोणावळा स्थानकाजवळ होणाऱ्या कामांमुळे ७, ८ आणि १० डिसेंबर रोजी पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. या ब्लॉकमुळे इंटरसिटी, डेक्कन क्वीनसह १४ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या.
देवरीनजीक राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत छत्तीसगडमधील तीन मजुरांचा मृत्यू झाला असून, जवळपास ४० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Indigo flights from Mumbai Pune Nagpur cancelled : इंडिगो एअरलाइन्सने देशभरातील प्रमुख विमानतळांवर ५०० हून अधिक विमाने रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. क्रू कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन FDTL नियमांमुळे हा अडथळा निर्माण झाला.
Mumbai Worli real estate prices : अॅनारॉक ग्रुपच्या अहवालानुसार, मुंबईतील वरळी हे भारताच्या अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट बाजारपेठेचे केंद्र बनले असून, येथे देशातील ४०% वाटा आहे. येथे ५,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे महागडे सौदे झाले.
School Bandh : शिक्षण विभागाच्या वादग्रस्त निर्णयांविरोधात महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आज मोठे आंदोलन छेडले असून राज्यातील ८० हजारांहून अधिक शाळा बंद आहेत.
BMC Elections 2025 : १० डिसेंबरला मतदारयाद्या जाहीर होणार असून १५–२० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांनी जानेवारीत निवडणुकांच्या संभाव्य तारखांचे संकेत दिले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्यात आला असून, तो आता चाकण, अहिल्यानगर आणि शिर्डीमार्गे जाईल. जीएमआरटी दुर्बिणीच्या परिसरातून मूळ मार्ग जात असल्याने झालेल्या आक्षेपानंतर हा बदल करण्यात आला, ज्यामुळे संगमनेर शहर वगळले गेले आहे.
Digital 7/12 : महाराष्ट्र राज्य सरकारने डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता नागरिकांना तलाठ्याच्या सही-शिक्क्याशिवाय केवळ १५ रुपयांत अधिकृत डिजिटल उतारा मिळणार आहे.
Maharashtra