Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पावसाने माघार घेतली असली तरी हवामान खात्याने बदलाचे संकेत दिले. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता असून, विदर्भ, मराठवाड्यात मात्र थंडीची चाहूल लागली. मुंबई, पुण्यात ढगाळ वातावरण राहील.
Central Railway Update: मध्य रेल्वेने बेलापूर-उरण रेल्वेमार्गावर १० नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याची घोषणा केली, ज्यामुळे फेऱ्यांची संख्या ५० होईल. नवी मुंबई विमानतळाजवळ असलेले तरघर, गव्हाण ही २ नवीन रेल्वे स्थानके याच महिन्यात प्रवाशांसाठी खुली होणारय.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC करण्याची मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे सरकारने हा निर्णय घेतला असून, ऑक्टोबर महिन्याचा ₹1500 सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
Crop Insurance Update: राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी १७,५०० रुपयांची मदत जाहीर केली. तथापि, ही रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार नसून, तिचे वितरण महसूल मंडळांच्या पीक कापणी प्रयोगांच्या अहवालावर अवलंबून असेल.
Pune Kolhapur Railway Update: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात इंटरलॉकिंगच्या कामामुळे पुणे-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक ६ नोव्हेंबरला १२ तास ठप्प राहणार आहे. या कामामुळे सह्याद्री, कोयना एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Maharashtra Rain Alert : नोव्हेंबर महिन्यातही पावसाने राज्यभर हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Local Body Election : भाजपने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख आणि प्रभारींची नियुक्ती केली आहे. बीडमध्ये सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस अपेक्षित असून, विदर्भात हवामान कोरडे राहील.
Indorikar Maharaj Daughter Engagement: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कन्येचा साखरपुडा सोहळा संगमनेर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला अनेक राजकीय मान्यवरांनी हजेरी लावली.
व्हायरल व्हिडिओ: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीने आपल्या ऑटोला लक्झरी कारमध्ये बदलले आहे. लोकांना त्याची ही कल्पना खूप आवडली असून ते त्याचे खूप कौतुक करत आहेत.
Maharashtra