- Home
- Maharashtra
- Pune Kolhapur Railway Update: मोठी बातमी! पुणे-कोल्हापूर रेल्वेसेवा ठप्प; 8 गाड्या रद्द, 3 मार्ग बदलले, प्रवाशांना दिलासा कधी?
Pune Kolhapur Railway Update: मोठी बातमी! पुणे-कोल्हापूर रेल्वेसेवा ठप्प; 8 गाड्या रद्द, 3 मार्ग बदलले, प्रवाशांना दिलासा कधी?
Pune Kolhapur Railway Update: मध्य रेल्वेच्या पुणे विभागात इंटरलॉकिंगच्या कामामुळे पुणे-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे वाहतूक ६ नोव्हेंबरला १२ तास ठप्प राहणार आहे. या कामामुळे सह्याद्री, कोयना एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुणे-कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी
Pune Kolhapur Railway Update: कोल्हापूर आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. आज, 6 नोव्हेंबर रोजी, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सुरू असलेल्या इंटरलॉकिंगच्या कामामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल 12 तास ठप्प राहणार आहे. या कामामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलले, तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची अद्ययावत माहिती तपासणे अत्यंत गरजेचे आहे.
इंटरलॉकिंगचे काम कुठे चालू आहे?
कोरेगाव, रहिमतपूर आणि तारगाव या स्थानकांवर सिग्नल आणि ट्रॅक सुधारणा (interlocking) काम सुरू आहे. या कामानंतर या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या गाड्या रद्द करण्यात आल्या
पुणे–कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस (01023)
कोल्हापूर–पुणे सह्याद्री एक्सप्रेस (01024)
कोल्हापूर–सातारा पॅसेंजर (71424)
सातारा–कोल्हापूर पॅसेंजर (71423)
कोल्हापूर–मुंबई कोयना एक्सप्रेस (11030)
मुंबई–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (11029)
मिरज–कोल्हापूर पॅसेंजर (71425)
कोल्हापूर–मिरज पॅसेंजर (71426)
या गाड्या कुर्डुवाडी मार्गे धावतील
यशवंतपूर–चंदीगड एक्सप्रेस (22685)
निजामुद्दीन–यशवंतपूर एक्सप्रेस (12630)
बंगळूर–जोधपूर एक्सप्रेस (16508)
शॉर्ट टर्मिनेट व शॉर्ट ओरिजिनेट होणाऱ्या गाड्या
कोल्हापूर–पुणे एक्सप्रेस किर्लोस्करवाडीपर्यंतच धावेल
कोल्हापूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस कराड येथेच थांबेल
गोंदिया–कोल्हापूर एक्सप्रेस पुणे येथेच थांबवली जाईल
या बदलांमुळे पुणे, सातारा, कराड, मिरज आणि कोल्हापूर परिसरातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
प्रवाशांना रेल्वे प्रशासनाचा सल्ला
मध्य रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास सुरू करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती (Train Status) IRCTC किंवा रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासा. तसेच, हे इंटरलॉकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गिकेवरील सिग्नल प्रणाली अधिक आधुनिक व अचूक होणार आहे, ज्यामुळे पुढील काळात गाड्यांच्या वेळा अधिक नियमित राहतील.

