- Home
- Mumbai
- नवी मुंबईकरांसाठी मेगा गिफ्ट! बेलापूर-उरण मार्गावर 10 नवीन लोकल फेऱ्या, 2 नवी स्थानकेही सुरू होणार; तरघर स्टेशन ठरणार गेमचेंजर
नवी मुंबईकरांसाठी मेगा गिफ्ट! बेलापूर-उरण मार्गावर 10 नवीन लोकल फेऱ्या, 2 नवी स्थानकेही सुरू होणार; तरघर स्टेशन ठरणार गेमचेंजर
Central Railway Update: मध्य रेल्वेने बेलापूर-उरण रेल्वेमार्गावर १० नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याची घोषणा केली, ज्यामुळे फेऱ्यांची संख्या ५० होईल. नवी मुंबई विमानतळाजवळ असलेले तरघर, गव्हाण ही २ नवीन रेल्वे स्थानके याच महिन्यात प्रवाशांसाठी खुली होणारय.

नवी मुंबईकरांसाठी Good News!
Central Railway Update: नवी मुंबईकरांसाठी रेल्वेकडून मोठी आनंदवार्ता आली आहे. मध्य रेल्वेच्या बेलापूर–उरण रेल्वेमार्गावर आता 10 नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. याचसोबत तरघर आणि गव्हाण ही दोन नवी रेल्वे स्थानकेही या महिन्यात सुरु होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या जवळ असलेले तरघर रेल्वे स्थानक हे प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांसाठी सर्वात सोयीचे ठरणार आहे.
दुहेरी आनंद, वाढीव फेऱ्या आणि नवी स्थानके
सध्या सीवूड–बेलापूर–उरण मार्गावर लोकल फेऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. सध्या दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने 5 अप आणि 5 डाउन अशा एकूण 10 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव फेऱ्यांमुळे प्रवासाची सुलभता वाढेल आणि उरण मार्गावरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या 40 वरून 50 वर पोहोचणार आहे. यामुळे दोन फेऱ्यांमधील वेळेचे अंतर मोठ्या प्रमाणात कमी होईल.
तरघर आणि गव्हाण स्थानकांची कामे पूर्ण
तरघर आणि गव्हाण या दोन्ही स्थानकांवरील प्रमुख कामे पूर्ण झाली असून, किरकोळ अंतिम कामे सुरू आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीपर्यंत दोन्ही स्थानके सुरू करण्याचे नियोजन आहे. गव्हाण स्थानकात स्वच्छतागृह, फलाट, तिकीट घर, वाहनतळ यांसह सर्व सुविधा सज्ज आहेत. दोन्ही स्थानकांचे बांधकाम सिडको (CIDCO) मार्फत करण्यात आले आहे.
तरघर स्टेशन, विमानतळासाठी नवे कनेक्शन पॉइंट
तरघर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्वाधिक जवळचे रेल्वे स्थानक असेल.
हे स्टेशन प्रवासी आणि विमानतळातील कर्मचाऱ्यांसाठी मुख्य ट्रान्झिट हब ठरणार आहे.
तरघर स्टेशनची वैशिष्ट्ये
विमानतळाला जोडणारे सर्वात जवळचे स्टेशन
सुमारे 2 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर उभारलेले
स्टेशन परिसराला कोस्टल रोड, मेट्रो आणि स्कायट्रेनशी जोडण्याचे नियोजन
5 फलाट आणि 730 चारचाकी क्षमतेचे वाहनतळ
खासगी गाड्या, बस आणि रिक्षांसाठी स्वतंत्र ये-जा व्यवस्था
रेल्वे प्रशासनाचा दावा
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “बेलापूर-उरण मार्गावरील प्रवासी संख्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे वाढीव लोकल फेऱ्या आणि नवी स्थानके सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि प्रवास अधिक सुलभ बनेल,” असे ते म्हणाले.

