MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC ची मुदत वाढली, जाणून घ्या शेवटची तारीख

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! E-KYC ची मुदत वाढली, जाणून घ्या शेवटची तारीख

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC करण्याची मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. तांत्रिक अडचणींमुळे सरकारने हा निर्णय घेतला असून, ऑक्टोबर महिन्याचा ₹1500 सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 06 2025, 03:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!
Image Credit : social media

लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी!

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी E-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक महिलांनी अजूनही आपली E-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे सरकारने अवधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
E-KYC साठी नवीन अंतिम तारीख
Image Credit : social media

E-KYC साठी नवीन अंतिम तारीख

महिला व बाल कल्याण विभागाने घेतलेल्या अलीकडील बैठकीत E-KYC करण्याची मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही अंतिम तारीख १ नोव्हेंबरपर्यंत होती, मात्र अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे OTP न मिळाल्याने प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने महिलांना आणखी १७ दिवसांचा दिलासा दिला आहे. 

Related Articles

Related image1
Pune Kolhapur Railway Update: मोठी बातमी! पुणे-कोल्हापूर रेल्वेसेवा ठप्प; 8 गाड्या रद्द, 3 मार्ग बदलले, प्रवाशांना दिलासा कधी?
Related image2
Crop Insurance Update: शेतकऱ्यांना मिळणार १७,५०० रुपयांचा दिलासा! पण नेमकं कधी? जाणून घ्या अटी आणि प्रक्रिया
35
ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वाटप सुरू
Image Credit : social media

ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वाटप सुरू

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी ₹1500 वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये थेट जमा होईल. सरकारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी दिली आहे. 

45
OTP येत नसेल तर काय कराल?
Image Credit : Asianet News

OTP येत नसेल तर काय कराल?

अनेक महिलांना ई-केवायसी करताना OTP न मिळण्याची अडचण येत आहे. ही प्रक्रिया सध्या पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकावर OTP येण्यावर आधारित असल्याने निराधार महिलांना अडथळे येत आहेत. सरकारकडून यावर नवीन पर्याय किंवा तांत्रिक उपाययोजना तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच यासंबंधी अधिकृत मार्गदर्शन जाहीर होण्याची शक्यता आहे. 

55
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन
Image Credit : iSTOCK

महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दोन महिन्यांपूर्वीच सर्व महिलांना E-KYC लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. अनेक जिल्ह्यांत अजूनही प्रक्रिया अपूर्ण असल्याने विभागाने मुदतवाढ दिली आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Manoj Jarange Patil : जरांगे पाटील ऑडिओ लीक प्रकरणाच्या SIT चौकशीचं शिवसेनेकडून स्वागत
Recommended image2
Tulja Bhavani Temple Viral Video: धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांना धक्काबुक्की, संतापजनक व्हिडिओ व्हायरल
Recommended image3
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिमुकलीने फोडली पिगी बँक, फडणवीसही भारावले
Recommended image4
Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू, महायुती आणि मविआची प्रतिष्ठा पणाला
Recommended image5
Chhatrapati Sambhajinagar Crime : 'झाशीची राणी'चं... पेन्शनसाठी आजीबाई भिडल्या, चोरट्याला पळवून लावलं
Related Stories
Recommended image1
Pune Kolhapur Railway Update: मोठी बातमी! पुणे-कोल्हापूर रेल्वेसेवा ठप्प; 8 गाड्या रद्द, 3 मार्ग बदलले, प्रवाशांना दिलासा कधी?
Recommended image2
Crop Insurance Update: शेतकऱ्यांना मिळणार १७,५०० रुपयांचा दिलासा! पण नेमकं कधी? जाणून घ्या अटी आणि प्रक्रिया
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved