MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Crop Insurance Update: शेतकऱ्यांना मिळणार १७,५०० रुपयांचा दिलासा! पण नेमकं कधी? जाणून घ्या अटी आणि प्रक्रिया

Crop Insurance Update: शेतकऱ्यांना मिळणार १७,५०० रुपयांचा दिलासा! पण नेमकं कधी? जाणून घ्या अटी आणि प्रक्रिया

Crop Insurance Update: राज्य सरकारने खरीप हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी १७,५०० रुपयांची मदत जाहीर केली. तथापि, ही रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळणार नसून, तिचे वितरण महसूल मंडळांच्या पीक कापणी प्रयोगांच्या अहवालावर अवलंबून असेल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Nov 06 2025, 03:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी १७,५०० मदत देण्याची घोषणा
Image Credit : Asianet News

पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी १७,५०० मदत देण्याची घोषणा

Crop Insurance Update: खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर आणि अनियमित हवामानामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल ३१ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत हेक्टरी १७,५०० रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, ही मदत तात्काळ मिळणार नाही. कारण या रकमेचे वितरण महसूल मंडळांच्या पीक कापणी प्रयोगांच्या अहवालावर अवलंबून असेल. 

25
पीक विमा योजनेचा आढावा
Image Credit : Getty

पीक विमा योजनेचा आढावा

कृषी विभागाच्या माहितीनुसार, या योजनेत सहभागी झालेल्या सुमारे ९०% शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. आतापर्यंत राज्यातील जवळपास ८२% महसूल मंडळांमधील पीक कापणी प्रयोगांचे आकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरित आकडे १५ डिसेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम डिसेंबर अखेरपर्यंतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा अंदाज आहे. 

Related Articles

Related image1
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही 21वा हप्ता! पाहा, तुमचं नावही आहे का यादीत?
Related image2
ऐकलं का पाटील.. नवीन Royal Enfield Bullet 650 चा रुबाबदार अंदाज, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फिचर्स!
35
भरपाई ठरवण्याचे निकष काय असतील?
Image Credit : iSTOCK

भरपाई ठरवण्याचे निकष काय असतील?

महसूल मंडळाकडून मिळालेल्या सध्याच्या उत्पादनाची तुलना मागील ५ वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी केली जाईल.

जर चालू वर्षीचे उत्पादन सरासरीपेक्षा १०% कमी असेल, तर शेतकऱ्यांना विमा रकमेच्या १०% भरपाई मिळेल.

आणि जर उत्पादन १००% नुकसान (पूर्णतः हानी) असेल, तर शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षण रक्कम मिळेल.

सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण रक्कम ५६,००० रुपयांपर्यंत आहे. मात्र, पूर्ण भरपाईसाठी त्या मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे आवश्यक आहे.

45
खरीप हंगामातील प्रचंड नुकसान
Image Credit : iSTOCK

खरीप हंगामातील प्रचंड नुकसान

जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टी, पूर आणि ढगफुटीच्या घटनांनी राज्यातील शेतीला मोठा फटका बसला. सोयाबीन, तूर, मका आणि कापूस या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून आता रब्बी हंगामासाठी त्यांना नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. 

55
शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

राज्यभरातील महसूल मंडळांमधून पीक कापणी प्रयोगांचा डेटा संकलित करण्याचे काम सुरू आहे. कृषी विभागानुसार, सर्व आकडे पूर्ण मिळाल्यानंतरच विमा कंपन्या नुकसानभरपाईची अंतिम रक्कम निश्चित करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली रक्कम डिसेंबर अखेरपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मुंबईत भाजपचा ऐतिहासिक 'सर्जिकल स्ट्राईक'! नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना बोचरा टोला; म्हणाले, "आता थेट इस्लामाबादची फ्लाईट पकडा..."
Recommended image2
Maharashtra Election Results 2026 : जळगावमध्ये भाजपने इतिहास घडवला, गिरीश महाजनांचा 'मास्टरस्ट्रोक', सर्वच उमेदवार विजयी
Recommended image3
Pune PMC Results 2026 : पुण्यात भाजपची ‘लाट’, २०१७ प्रमाणेच बहुमताच्या दिशेने निर्णायक वाटचाल
Recommended image4
'45 मिनिटे लिफ्ट बंद', व्हीलचेअरवरील कॉमेडियनकडून Mumbai Metro ची पोलखोल [VIDEO]
Recommended image5
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026 : आज महाफैसला, 29 महापालिकांची 'लिटमस टेस्ट'
Related Stories
Recommended image1
PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही 21वा हप्ता! पाहा, तुमचं नावही आहे का यादीत?
Recommended image2
ऐकलं का पाटील.. नवीन Royal Enfield Bullet 650 चा रुबाबदार अंदाज, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फिचर्स!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved