कराडमध्ये दोन महिला डॉक्टरांचे चेहरे वापरून AI द्वारे बनावट अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, सायबर तपास सुरू केला आहे. ही घटना AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे गंभीर उदाहरण आहे.
गणेशोत्सवावेळी पीओपीच्या गणपतीच्या मुर्तींच्या विसर्जनाबद्दल राज्य सरकारकडून नवे धोरण लवकरच जाहीर केले जाणार आहेत. याकडे मुंबईतील काही मोठ्या आणि प्रसिद्ध मंडळाचे लक्ष लागून राहिले आहे.
Municipal Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेत असून, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
शरद पवारांच्या एनसीपी गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय या पदासाठी तीन जणांची नावे दावेदार म्हणून घेतली जात आहेत. मात्र शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूरमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीला जमावाने कपडे फाटेपर्यंत चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर, वन वे मार्गावरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या चालकाने रस्त्यामधील काही दुचाकींना धडक दिली. यामुळे दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
भारत हवामान विभागाने जून १३ नंतर महाराष्ट्रातील काही विभागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून, ठाणे, मुंबई आणि पालघरसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
नितेश राणेंना डिवचणारे बॅनर्स ठाण्यात झळकवण्यात आले आहेत. खरंतर, देवेंद्र फडवणीस हे माझे बाप नाहीत असा आशय बॅनरवर लिहिण्यात आला आहे. यामुळे राणे पिता-पुत्र काय उत्तर देणार हे पहावे लागणार आहे.
जालना जिल्ह्यातील वरुड गावात शेतात काम करत असताना विजेचा धक्का लागून एका शेतकरी पित्यासह त्याच्या दोन चिमुकल्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलांनाही विजेचा धक्का लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
महाराष्ट्र सरकारने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही महिन्यांपासून बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना त्यांच्या धाराशिवमधील वादग्रस्त वक्तव्यावरून समज दिली आहे. नितेश राणे यांच्या 'सगळ्यांचा बाप' या वक्तव्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाले होते.
Maharashtra