Municipal Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेत असून, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Municipal Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या हालचालींना आता अधिक वेग आला आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. अ, ब आणि क वर्गातील महापालिकांसाठी ही प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. या यादीत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली या ९ महापालिकांचा समावेश आहे.

गेल्या ३-४ वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवर आता प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रभाग रचनेसंदर्भात राज्य शासनाने संबंधित प्रशासनांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत. लोकसंख्येचे निकष लक्षात घेऊन प्रभागांची आखणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिका विशेष:

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात मात्र, पूर्वीप्रमाणेच 227 *एकसदस्यीय प्रभागांवरच निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीच्या काळात 236 प्रभाग करण्यात आले होते. मात्र सत्तांतरानंतर ते पुन्हा 227 वर आणले गेले होते. ही बाब न्यायालयात आव्हान दिल्यानंतरही कायम ठेवण्यात आली. त्यामुळे BMC निवडणुका जुन्याच रचनेनुसार होणार हे स्पष्ट झाले आहे.

विविध वर्गांनुसार महापालिका रचना:

अ वर्ग : पुणे, नागपूर – चार सदस्यांचे प्रभाग

ब वर्ग : ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड – चार सदस्यांचे प्रभाग

क वर्ग : नवी मुंबई, वसई विरार, छ. संभाजीनगर, कल्याण डोंबिवली – चार सदस्यांचे प्रभाग

ड वर्ग : अमरावती, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, मालेगाव, लातूर आदी – प्रभागसंख्या 3, 4 किंवा 5 सदस्यांमध्ये असणार

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लवकरच महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार हे निश्चित आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.