मी सर्वांची नावं घेणार, शांत बसणार नाही, डॉ. अजय तावरे यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.
तब्बल 79 दिवसानंतर पुन्हा एकदा विठुरायाच्या पायावरील दर्शनास 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. विठुरायाच्या पूजेला पालकमंत्री उपस्थित राहणार असून वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
१० वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. याशिवाय, विद्यार्थी डिजीलॉकर ॲप, वेबसाईटसह इतर अनेक मार्गानी SSC बोर्ड परीक्षा २०२४ चा निकाल पाहू शकता. यंदा DigiLocker वर एसएससी निकालाची डिजिटल कॉपीही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करू दिली जाणार आहे.
दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. लातूर विभागातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त टक्के मिळाले असून त्यांची संख्या १२३ आहे. लातूर पॅटर्नमध्ये धाराशिव, नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.
दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून दहावीप्रमाणेच बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. दहावीमध्ये मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे.
पुणे हिट अँड रन केसमधील आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयाचे डॉक्टर मागे राहिले नाहीत. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. अजय तावरे यांच्याशी अगरवाल यांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता. त्यामुळे तावरे यांना अटक करण्यात आली आहे.
मालगेवमध्ये रात्री राजकीय व्यक्ती असणाऱ्या माजी महापूर अब्दुल मलिक यांच्यावर जवळून गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडण्यात आला असून नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
महाळंगी येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्याचा तडाखा संपूर्ण गावास बसला. वीज पडून 2 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून गावात अनेकांच्या घरावरील पत्रेही उडाली असल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील बाॅलर पबसह १४ पब, बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाने मुंढवा, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई सुरू केल्याने या भागात शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.