मराठा आंदोलकांनी राज्य परिवहानाची बस पेटवल्याचा प्रकार जालन्यात घडला आहे. यामुळे जालन्यात बस सेवा बंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात पुणे येथून एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
मराठा आरक्षणसाठी संघर्ष करत असलेल्या मनोज जरांगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाला म्हटले की, मी शांतपणे आंदोलन करणार आहे. खरंतर, मनोज जरांगेंनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून हे आश्वासन कोर्टाला दिलेय.
Maharashtra Bhushan Puraskar : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
BMC Hospital News : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा संतापजनक प्रकार सरकारी हॉस्पिटलमध्ये घडला होता. याप्रकरणी तीन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवे पक्ष चिन्ह देण्यात आले आहे. यानुसार शरद पवार यांना 'तुतारी' पक्ष चिन्ह दिले आहे.
Manohar Joshi : शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (23 फेब्रुवारी) पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी जोशी यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिराचे बांधकाम खासदार पूनम महाजन यांच्या मतदारसंघात करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले आहे.