विशेष म्हणजे शरद पवारांनी या पदासाठी पश्चिम महाराष्ट्रातूनच एक निष्ठावंत, अनुभवसंपन्न चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे पक्षातील जुनी निष्ठावंत गटबांधणी जपण्यासह नव्या पिढीला दिशा देण्याचे काम शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवल्याचे सांगितले जात आहे.
पावसाळ्यात कोकणातील गणपतीपुळे, आरे-वारे, भोगवे आणि कुणकेश्वर हे बीच खास आकर्षण ठरतात. धुके, हिरवळ आणि शांत वातावरण अनुभवायला या ठिकाणी भेट द्या.
मुंबई - श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हिंदी पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात लवकर होते, तर मराठी पंचांगात श्रावण काही दिवस उशिरा सुरू होतो. असं का होतं, यामागचं शास्त्र काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
पुण्यातील बावधन परिसरात वाढदिवसाच्या पार्टीत फटाक्यांऐवजी बंदूकीतून हवेत दोन राउंड फायरिंग करण्यात आले. आरोपी दिनेश सिंह याला पोलिसांनी अटक केली असून त्याचे परवाना असलेले पिस्तूल जप्त केले आहे.
राज्यातील जमिनींच्या नाव नोंदणीमध्ये बदल होणार आहे. सातबाऱ्याच्या उताऱ्यावर आता जमीन क्षेत्रासह त्या जमिनीवरील पोट हिस्स्याची देखील नोंदणी केली जाणार आहे. याबद्दलची माहिती शेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यात एका आदिवासी जोडप्याला सामुदायिक परंपरेविरुद्ध लग्न केल्यामुळं नांगराला जुंपून ओढण्याची शिक्षा देण्यात आली. कंजामाजोडी गावात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुंबई : कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे. पण मुंबई, ठाणे या भागात पावासाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे.
शनि शिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्त मंडळाने मोठा आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण समोर आले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
12th July 2025 Updates : दिल्लीमधील सिलामपुरमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 3-4 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स येथे एका क्लिकवर वाचा...
Chhatrapati Shivaji Maharaj forts in unesco world heritage list : छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ किल्ल्याचा समावेश यात आहे.
Maharashtra