Chhatrapati Shivaji Maharaj forts in unesco world heritage list : छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ किल्ल्याचा समावेश यात आहे.

मुंबई : महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस! छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी आणि ऐतिहासिक १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामाविष्ट करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती स्वतः सोशल मीडियावरून जाहीर करत सर्व शिवप्रेमींना अभिमानाचा क्षण बहाल केला आहे.

कोणते आहेत हे १२ जागतिक दर्जाचे किल्ले?

महाराष्ट्रातील ११ किल्ले: रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी

तामिळनाडूमधील १ किल्ला: जिंजी

युनेस्कोचा गौरव, ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ मान्यता

या किल्ल्यांचे माची स्थापत्य, गुप्त मार्ग, दुर्गम रचना, रणनीतीपूर्ण वास्तुरचना हे सर्व वैशिष्ट्ये जगात कुठेच सापडत नाहीत. हेच मराठा स्थापत्यशास्त्राचे विश्वस्तरीय यश ठरले आहे.

यशामागचे प्रयत्न

मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष आभार मानले असून केंद्र सरकार, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, संस्कृती मंत्रालय, युनेस्कोतील भारतीय राजदूत, अशा अनेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मंत्री आशिष शेलार यांचे युनेस्कोला दिलेले तांत्रिक सादरीकरणही निर्णायक ठरले.

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण

हे फक्त स्थापत्य किंवा इतिहास नव्हे, तर शिवरायांच्या स्वराज्याचे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त प्रतीक आहे. हे यश म्हणजे शिवप्रेम, राज्यप्रेम आणि सांस्कृतिक वैभवाची आंतरराष्ट्रीय ओळख.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले

“हा क्षण ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली आहे. शिवरायांचे गड आता जागतिक मानदंडावर पोहोचले आहेत. हे यश प्रत्येक शिवभक्ताचं आहे!”

Scroll to load tweet…