SHIRUR Lok Sabha Election Result 2024: शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांनी तब्बल 70 हजारांच्या मताधिक्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला.
PUNE Lok Sabha Election Result 2024: राज्यातील लक्षवेधी असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.
BHIWANDI Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा दणदणीत विजय झाला आहे.
MUMBAI NORTH CENTRAL Lok Sabha Election Result 2024: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव करत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आहेत.
Madha Lok Sabha Election Result 2024: माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले आहेत.
RAIGAD Lok Sabha Election Result 2024: रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत तुल्यबळ मानली जातेय. यावेळी पुन्हा सुनिल तटकरे यांच्या विरुद्ध अनंत गीते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
DINDORI Lok Sabha Election Result 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे यांनी विजय मिळवला आहे.
BARAMATI Lok Sabha Election Result 2024: सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.
MUMBAI NORTH EAST Lok Sabha Election Result 2024: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी विजय मिळवला आहे.
NAGPUR Lok Sabha Election Result 2024: देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर मतदारसंघाकडे राज्यासह अवघा देशाचे लक्ष लागले होते. अखेर नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रिक करत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा दारूण पराभव केला आहे.