डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये मोठा स्फोट झाला असून यामध्ये अकरा जणांचा अद्याप मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. येथे अजूनही बचावकार्य चालू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे कल्याणीनगर येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघाताचे नवीन ट्विस्ट समोर आले आहे. यावर अल्पवयीन आरोपींच्या मित्रांनी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा दावा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना भरधाव कारने चिरडल्याचा आरोप असलेल्या १७ वर्षीय तरुणाला बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार देखरेख केंद्रात पाठवण्यात आले आहे. जाणून घेऊया रिमांड होममध्ये आरोपींचा दिनक्रम काय असेल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घटनेनंतर पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाईला सुरुवात झाली. कोरेगावमधील बड्या पब्जवर पालिकेने कारवाई केली असून संपूर्ण पुणे शहरातील पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाई करण्याची माहिती वसंत मोरेंनी केली.
भीमा नदी पात्रात बोट बुडाली या दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत.
अहमदनगरमध्ये बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उजनी बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या मराठवाड्यात दुष्काळसदृश स्थिती आणखी गंभीर झाली आहे. गुरांना चारा मिळेनासा झाला आहे. अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.
Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघतामधील आरोपीला अपघातांवर निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी बाल हक्क न्यायालयाने आपल्या आदेशात बदल केले आहे. सदर आरोपीला आता 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पुण्यात 'वंदे मातरम संघटने'तर्फे न्यायालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. आरोपी विशाल अग्रवाल यांना न्यायालयात आणले असताना त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.