Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 10 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. कुटुंब उत्पन्न, इतर योजनांचा लाभ, वयोमर्यादा आणि कुटुंबातील महिलांची संख्या या निकषांमुळे अर्ज अपात्र ठरले आहेत.
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील जवळपास 10 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले असून, आता त्यांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला मिळणारे ₹1500 मिळणार नाहीत.
लाखो महिलांना योजनेतून वगळण्यात आले
महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेत अर्जांची तपासणी आणि पडताळणी सुरू असून, त्यात मोठ्या प्रमाणावर महिलांचे अर्ज अपात्र ठरवले गेले आहेत. ही संख्या जवळपास 10 लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारणांमुळे अर्ज झाले बाद
लाडकी बहीण योजनेत अर्ज फेटाळले जाण्यामागे अनेक कारणे पुढे आली आहेत:
ज्या महिलांचे कुटुंब उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, त्या अपात्र ठरवल्या.
इतर सरकारी योजना लाभ घेत असलेल्या महिलांना वगळण्यात आले.
प्रत्येक कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच लाभ मिळू शकतो. त्यामुळे तिसरी महिला असल्यास ती बाद.
वयाच्या 21 ते 65 वयोगटात नसलेल्यांनाही योजनेपासून वंचित ठेवलं गेलं.
प्राप्तिकर विभागाच्या मदतीने उत्पन्नाची माहिती घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.
महिलांची नाराजी, तक्रारींचा भडका
आपला अर्ज बाद झाला हे कळताच अनेक महिलांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष विभागात जाऊन तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला असून, शासनाकडून खुलासा होण्याची अपेक्षा आहे.
तुमचा अर्ज अपात्र आहे का? अशा प्रकारे करा तपासणी
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, तर आपला अर्ज बाद झालाय का हे तपासण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन आपली स्थिती तपासू शकता.
लक्षात ठेवा, पात्रता निकष
वय 21 ते 65 वर्षे
कुटुंब उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी
इतर योजनांचा लाभ नसावा
कुटुंबातील महिलांची संख्या अधिकतम 2 महिलांनाच लाभ
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरली होती, मात्र अर्ज फेटाळण्याच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. जर तुमचा अर्जही बाद झाला असेल, तर त्यामागचं कारण जाणून घ्या आणि आवश्यक असल्यास तक्रार नोंदवा.


